Published On : Fri, Sep 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कांद्री वस्ती येथे भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी.

Advertisement

कांद्री वस्ती येथे भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी.

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री वस्ती येथे १० सप्टेंबर रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास दोन दुचाकींची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मृत युवकाचे नाव आकाश रतिराम भरडे (२६) असे असून जखमींमध्ये अरविंद मदन नायक (२०) आणि विशाल विनोद भलावी (२०) यांचा समावेश आहे. तिघेही देवरी, बोरडा येथील रहिवासी आहेत.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही मोटरसायकल क्रमांक MH-40-DA-5419 ने कांद्री वस्तीवरून देवरीकडे जात असताना त्यांच्या सोबत जात असलेल्या दुसऱ्या मोटरसायकलला धडक झाली. धडकेनंतर तिघेही रस्त्यावर पडले. यात आकाश भरडे यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच टोल प्लाझावरील रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी दोघांना तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Advertisement

अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.

अजय मेहरकुळे रामटेक नागपूर

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.