Published On : Mon, Jul 15th, 2019

अवैध कोळसा चोरी वाहतुकीचा दहाचाकी ट्रक पकडला

कोळशा ट्रक सह १४ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

कन्हान: पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत वेकोलि घाटरोहणा परिसरात मोठय़ा प्रमाणात कोळशा , डिझेल, लोखंड, तांबे चोरीचे प्रमाण जोमाने वाढत असुन वेकोलि सुरक्षा अधिकारी व पोलीस प्रशासन यांचा सुरताल बिघडल्यास झुटमुट कार्यवाही करण्यात येत असते याचाच एक भाग म्हणजे गोंडेगाव परिसरात सोमवार (दि.१५) सकाळी ९ वाजता फिर्यादी ओमप्रकाश पाल यांच्या तक्रारीवरून चंन्द्रकांत काळे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक प्रमोद पवार यानी घाटरोहणा पाधन रोड वर ट्रक थाबुन अवैध चोरीचा कोळसा वाहतूक करतांना दहाचाकी ट्रक क्र एम एच ४० – ६७१६ मध्ये २० टन कोळशा भरून नेताना पकडले. यात कोळशा ट्रक किंमत १४ लाख व २० टन कोळसा किंमत ८० हजार असा एकुण १४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रक चालक फरार झाल्याने कोळशा टाल मालक उमेश पानतावने यांचे विरूध्द कलम ३७९ भादंवि नुसार कार्यवाही करून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. ही कार्यवाही कन्हान पोलीस स्टेशनचे एं पी आय प्रमोद पवार, वरकड़े, विरेन्दसिग चौधरी व संदिप हयानी यशस्वी केली असुन कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहे.