Published On : Thu, Dec 27th, 2018

कांद्री शाळेची निसर्ग भेट

रामटेक/शहर प्रतिनिधी :- रामटेक पंचायत समिती केंद्र मनसर अंतर्गत असलेल्या उच्च प्राथमिक शाळा कांद्रीच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग भेटीचा आनंद घेतला. मुख्याध्यापक प्रशांत जांभुळकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना परिसरातील शेती,भाजीपाल्याची मळे,तलाव,बंधारा, यांची माहिती करून देण्यांत आली.

परिसरातील विविध झाड,प्राणी ,परिसराची माहिती,विविध खेळ, नृत्य गोष्टी,गीतगायन,अंताक्षरी सह सामान्यज्ञान इत्यादी उपक्रमात विद्यार्थी रममान झाले.शिक्षिका निलिमा डेकाटे, ज्योती जांभुळकर ,सुजाता नागदेवे,संगीता मेश्राम,ममता भैसाळे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी वनभोजन केले.

शिक्षक अशोक चवरे व राहूल मानेकर यांनी क्षेत्रभेटीची माहीती दिली.अंगणवाडीचे लहान लहान बालकही सहलीत सहभागी झाले होते.वैष्णवी बकाल,रूचिका वलोकर,प्रियंका भिलावे,आदर्श मेश्राम, सुवानी ताकोद,तेजस इडपाची यांनी मुख्याध्यापक प्रशांत जांभुळकर यांना सहकार्य केले.