कन्हान : – युवा चेतना मंच पारशिवनी, नेहरू युवा केंद्र नागपुर, ग्राम पंचायत कांद्री व जिला परिषद शाळा कांद्री यांच्या संयुक्त विद्यमानाने जि.प.शाळे च्या मैदानवर राष्ट्रीय खेळ दीवस व हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त “फिट इंडिया” कार्यक्रम संपन्न झाला.
ग्राम पंचायत कांद्रीचे सरपंच बलवंत पडोळे, ग्राम पंचायत सदस्य शिवशंकर चकोले, धनराज कारेमोरे, राहुल टेकाम, युवा चेतना मंच पारशिवनी चे अध्यक्ष विनोद कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जि प शाळेच्या पटांगणात शाळेचे मुल व गावातील नागरिकांनी योग व १०० मीटर दौड स्पर्धा, गीत गायन स्पर्धेत सहभागी होऊन ” स्वच्छ भारत स्वस्थ भारत ” बनिण्या करिता सर्वांनी फिट व तंदुरुस्त राहण्यासाठी शपथ घेतली.
कार्यक्रमास उपस्थित मुलांना व गावक-यांना ग्राम पंचायत कांद्रीच्या वतीने बिस्कीट व चहा चे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता पदाधिकारी गणेश सरोदे, संकेत चकोले,राहुल बागडे, नेहरू युवा केंद्राचे सदस्य श्याम मस्के, अजय कापसे, जि प शाळेच्या शिक्षिका व गावातील नागरिकां नी उपस्थित राहुन मौलाचे सहकार्य केले.
