Published On : Mon, Nov 4th, 2019

कन्हान-पिपरी सांस्कृतिक महोत्सव

दि. ८ ते १० नोव्हेंबर तीन दिवसी य विविध कार्यक्रम.

कन्हान : रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व ओबीसी /एस सी/एस टी /एन टी जनजागृती समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे तीन दिवस कन्हान-पिपरी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून विविध कार्यक्रमा व्दारे समाज प्रबोधन करण्यात येणार आहे.

शुक्रवार दि.८ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व ओबीसी /एस सी/एस टी /एन टी जनजागृती समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाची समाज कल्याण विभागा व्दारे शासकीय विविध योजनांची माहिती शिबिराचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा संजय पुजलवार यांच्या हस्ते उद्घाटन कन्हान नगराध्यक्ष मा शंकर चहांदे यांच्या अध्यक्षेत व पोलीस निरीक्षक कन्हान मा चंद्रकांत काळे यांच्या प्रमुख उपस्थित करून महोत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे.

सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत प्रसिध्द बाल संप्त खंजरी वादक कु तुळशी यशवंतराव हिवरे व्दारे परिवर्तनवादी समाज प्रबोधनाच्या कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि.९) ला सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत समाज कल्याण विभागा व्दारे शासकीय विविध योजनांची माहिती शिबिर, सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत महाराष्ट्राची मराठमोळी मैदानी बुलंद तोफ, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक मा. शिवश्री तुषार उमाळे, प्रसिध्द आंबेडकरी विचारवंत प्रा डॉ प्रदीप आगलावे, साहित्यिक मा धनराज डहाट आदींचे ओबीसी /एस सी/एस टी /एन टी सर्व बहुजन समाजाची दशा व दिशा या विषयावर मार्मिक समाज प्रबोधनपर मार्गदर्शन.

रविवार (दि.१०) ला सकाळी ९ ते ११ वाजता समाज कल्याण विभागा तर्फे शासकीय विविध योजनां ची माहिती शिबिराचा समारोप. सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत हिंदी भिम गितांचा युगल नजराणा. दुपारी ४ ते ५ वाजता रामटेक विधानसभा निवडणुकीत पराजित उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यासह तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. करिता कन्हान व परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने तीन दिवसी य कार्यक्रमास उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे हयानी केले आहे.