घातपाताच्या राजकारणात 80 हजार मते अनमोल – चंद्रशेखरजी बावनकुळे

चरणसिंग ठाकूर यांचा पराभव नव्हे हाच विजय*

घातपाताच्या राजकारणात चरणसिंग ठाकूर यांना काटोल मतदार संघातील जनतेनी 80 हजार मते देवून बहुमुल्य कामगिरी केले आहे. त्यामुळे ते हरले नसून जिंकले आहेत ते आमदार होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी सदैव त्यांच्या सोबत आहे.

Advertisement

आज स्नेहमिलनाच्या निमित्ताने जमलेल्या सहकारी बांधवांची गर्दी पाहून भारावलेलो आहे, शेवटच्या माणसांना न्याय देण्याकरिता मी चरणसिंग ठाकूर यांच्या पाठीशी उभा राहील.अशी प्रतिक्रिया नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी श्री सती अनुसया माता संस्थानच्या मल्टीयुटीलिटी हॉल मध्ये आयोजीत स्नेहमिलन कार्यक्रमात व्यक्त केली

Advertisement

चरणसिंग ठाकूर यांचा विविध आरोपांनी केलेला अपमान हा त्यांचा नसून उपस्थित प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांचा आहे म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून त्या अपमानाचा बदला आपण घ्यावा असे आवाहन मा. बावनकुळे साहेब यांनी उपस्थितांना केले.

या वेळी मा. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री नागपूर जिल्हा, मा. श्री राजीवजी पोतदार अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण, मा. श्री अशोकजी मानकर माजी आमदार, श्री अरविंद गजभिये भाजप जिल्हा महामंत्री, श्री चरणसिंग ठाकूर काटोल नरखेड विधानसभा प्रमुख, श्री उकेशजी चव्हाण माजी सभापती, श्री संदीप सरोदे माजी सभापती, श्री दिलीप ठाकरे भाजप अध्यक्ष काटोल तालुका, श्री जितेंद्र तुपकर भाजप अध्यक्ष काटोल तालुका,
श्री सुरेशजी खसारे अध्यक्ष मोवाड न.प., काटोल न प च्या नगराध्यक्षा सौ वैशाली ठाकूर,व सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते…

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement