कामठी नगर परिषद कार्यालयात महिला प्रसाधन गृहाला कुलूप
कामठी: केंद्र शासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2014 ला महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्याने स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये गाव स्वच्छ तर नागरिक स्वस्थ या संकल्पनेनुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आले त्यानुसार कामठी नगरपालिकेच्या वतीने तत्कालीन मुख्याधिकारी विपिन मुद्दा यांच्या कार्यकाळात मे 2015 ला वयक्तिक शौचालयाचा गाजावाजा करीत कामठी शहरात अभियान राबविण्यात आले या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व शौचालय बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले शिवाय गुडमॉर्निंग पथकादवारे उघड्यावर शौच करणाऱ्या व्यक्तीवर दण्ड वसुली करीत प्रतिबंध सुद्धा घालण्यात आला मात्र स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्या कामठी नगर परिषद कार्यालयातच महिला प्रसाधन गृहाला कुलूपबंद करून असल्याने येथील महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे परिणामी दुसऱ्याला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या कामठी नगर परिषद कार्यलयातच हा भोंगळ कारभार दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरातील’ ब’ वर्ग कामठी नगर परिषद मध्ये पुरुष नगरसेवकाच्या तुलनेत महीला नगरसेविकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणा त आहे सोबतच या कार्यालयात येणाऱ्या समस्त नागरिक, नगरसेवकगण तसेच कार्यालयिन अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र अशी पुरुष व महिला प्रसाधनगृह ची व्यवस्था करण्यात आली आहे यातील पुरुष प्रसाधन गृहाचा शक्यतो उपयोगात येतो मात्र येथील महिला प्रसाधन गृहाला कुलूपबंद करून असल्याने नगर परिषद मध्ये येणारे नागरिक गण तसेच कार्यलयीन कर्मचाऱ्यांना लघुशंकेसाठी ना हरकत त्रास भोगावा लागत आहे इतकेच नव्हे तर या लघुशंकेची पर्यायी व्यवस्था नसल्याने नगर परिषद मध्ये कार्यरत एक महिला कर्मचारी भोवळ येऊन पडल्याची घटना सुद्धा दुपारी 1 दरम्यान घडली असल्याची माहिती नगर परिषद च्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याचा अटीवर दिली तर या प्रकारामुळे येथील महिला कर्मचाऱ्यांना लघुशंकेचा रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
9 जानेवारी 2018 ला केंद्र सरकारच्या समितीने केलेल्या सर्वेक्षनात अभियानाची उद्दिष्टपूर्ती झाल्याचे दाखवून कामठी शहर हागणदारी मुक्त झाल्याचे जाहीर होण्यासह केंद्र सरकारने तसे प्रमाणपत्र सुद्धा कामठी पालिकेला बहाल करण्यात आले मात्र पुरस्कार प्राप्त कामठी नगर परिषद कार्यालयात महिलांसाठी होणारी ही गैरसोय नगर परिषद प्रशासनाला लज्जास्पद करणारी आहे तेव्हा पुरुष प्रशाधन गृहाच्या तुलनेत महिला प्रसाधन गृह सुद्धा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे अशी मागणी येथील जागरुक नागरिकांनी केली आहे .
– संदीप कांबळे कामठी