Published On : Sat, Oct 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कामठीत ‘डी-कंपनी’च्या नावाने धमक्यांचा खेळ; आरोपी मोहम्मद सैफसह साथीदारांवर गुन्हा

वाहन उभे करण्यावरून वाद विकोपाला; दोन भावांना मारहाण
Advertisement

कामठीत ‘डी-कंपनी’च्या नावाने धमक्यांचा खेळ; आरोपी मोहम्मद सैफसह साथीदारांवर गुन्हा

नागपूर : इन्स्टाग्रामवर ‘डी-कंपनी’च्या नावाने धमकीच्या रील्स प्रसारित केल्याचा आरोप असलेल्या तरुणांच्या टोळीचा कामठी परिसरात उपद्रव समोर आला आहे. इस्माईलपुरा परिसरात वाहन उभे करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी मोहम्मद सैफ (२०) याला अटक केली असून, त्याच्या साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे सात वाजता फिर्यादीचा १८ वर्षीय लहान भाऊ इस्माईलपुरा येथील राजा टी स्टॉलवर चहा आणण्यासाठी गेला होता. यावेळी रस्त्यावर वाहन उभे करण्याच्या कारणावरून मोहम्मद सैफ याच्याशी त्याचा वाद झाला. या वादातून सैफने शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर सैफ सहा ते सात साथीदारांसह तेथे आला. टोळीने दोन्ही भावांना मारहाण केली. तसेच चाकूसारखी शस्त्रे दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची तक्रार मिळताच नवीन कामठी पोलिसांनी तपास सुरू करून मुख्य आरोपी सैफ याला अटक केली. सैफविरोधात यापूर्वीही मारहाणीची तक्रार नोंद असल्याचे सांगण्यात आले. सोशल मीडियावर धमकीच्या रील्स प्रसारित करून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.