Published On : Mon, Sep 16th, 2019

कामठी छावणी परोषद ला दरवर्षी अडीच कोटी मिळणार:-पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

अधिकारी व नागरिकांच्या सहकार्याने कामठी कन्टोनमेंट बोर्डाची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल_ पालक मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे

कामठी :-कामठी कन्टोनमेंट बोर्डाचे अधिकारी पदाधिकारी व नागरिक यांच्या समन्वय व सहकार्यामुळे कन्टोनमेंट बोर्ड परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामाची सुरुवात झाली असून पालकमंत्री व ऊर्जामंत्री या नात्याने 772 कोटी चा निधी देण्याचे माझ्या हक्कात असून आगामी निवडणुकीतुन विजयश्री प्राप्त झाल्यानंतर कामठी कॅन्टोमेंट ला दरवर्षी अडीच कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे मत राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर व वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कँटोन्मेंट बोर्डाच्या वतीने आयोजित स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

नगर विकास मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने कँटोन्मेंट बोर्ड करिता 10कोटी 36 लक्ष रुपयेच्या मंजूर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपुर वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते पूजा आरती व दिपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी कन्टोनमेंट बोर्डाचे अध्यक्ष बीग्रेडियर पंकज मल्होत्रा ,छावणी बोर्डाचे मुख्य अधिकारी अभिजीत सानप, उपाध्यक्ष दिनेश स्वामी पिल्ले, उद्योगपती अजय अग्रवाल , बहुजन रिपब्लिकन एकता मंच नागपूर जिल्हा अध्यक्ष अजय कदम,, छावणी परिषद सदस्य सीमा यादव ,राजलक्ष्मी राव, सुनील फ्रान्सिस दीपक सीरिया ,महेंद्र भुटांनी, चंद्रशेखर लांजेवार ,गोपालसिंग यादव,कमल यादव, प्रेमेंद्र यादव, शहर भाजपा अध्यक्ष विवेक मंगतानी, गोपाल सीरिया, अरुण पोटभरे, लाला खंडेलवाल, राजेश दुबे,कपिल गायधने, अनंतलाल यादव, सरपंच गणेश झोड, सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे आदीउपस्थित होते.

कँटोन्मेंट बोर्डाच्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले बिग्रेडियर पंकज मल्होत्रा मुख्याधिकारी अभिजीत सानप बोर्डाचे सर्व पदाधिकारी व नागरिकांनी समन्वय साधून कँटोन्मेंट बोर्डाच्या विकासाकरिता प्रस्ताव सादर केल्यामुळे आपल्याला नगरविकास मंत्रालयाच्या वतीने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करता आली कँटोन्मेंट बोर्ड परिसरातील महादेव घाट , कन्हाननदी शांतीघाट, कॅन्टो बोर्डाच्या शाळा इमारती याकरिता आपण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असून ,आशा हॉस्पिटल ते वारेगाव बाह्य वळण मार्गाचे सिमेंटीकरण व पथदिवे लावण्यात येणार आहेत, ब्रिगेडियर पंकज मल्होत्रा यांनी पाणीपुरवठा योजनेच्या सौरऊरजे साठीजमीन उपलब्ध करून करून दिली तर पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर चालणार असल्यामुळे पूर्ण विजेची बचत होणार आहे व या सौर ऊर्जेवर पुढचे 25 वर्षे विजेचे बिल येणार नाही. कन्टोनमेंट बोर्ड परिसरात अंतर्गत कवेलू व टीनाचे घरे असलेल्या नागरिकांसाठी बोर्डाच्या वतीने परवानगी मिळाली तर प्रत्येक नागरिकाला आपण पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2.5 लक्ष रुपये मंजूर करून देणार असल्याचे सांगितले .समाजातील शेवटच्या नागरिकाला रस्ते, नाल्या, वीज, पाणी, अन्न व त्यांच्या सुरक्षसाठी सरकार वचनबद्ध असून आपण त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

कामठी छावणी परिषद ला दर महिन्याला 40 लक्ष रुपये खर्च करून नागपूर महानगर पालिकेच्या पंपिंग हाऊस कडून पाणी विकत घ्यावे लागते ज्याचा आर्थिक खर्च सांभाळणे छावणी परिषद ला असह्य आहे यासंदर्भात छावणी परिषद चे उपाध्यक्ष व समस्त सदस्य तसेच लालू यादव, गोपाल सीरिया यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून छावणी परिषद ची 10 कोटी 36 लक्ष रुपयाची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून ज्याचे आज थाटात भूमीपूजन करण्यात आले.

या 37 किलोमीटर च्या पाईपलाईन मधून या स्वतंत्र पाणी पुरवठा च्या साहाय्याने छावणी परिषद रहिवासी नागरिकांची पाण्याची समस्या सुद्धा सुटणार तसेच दर महिन्याला येनारा 40 लक्ष रुपयाचा आर्थिक खर्चाची सुदधा बचत होईल. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्य अभिलाशी अधिकारी अभीजीत सानप यांनी केले, संचालन मनिशा वाजपेयी, स्वाती तितरमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन भारती जुनुनकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी