Published On : Mon, Sep 16th, 2019

कढोलीत मोफत नेत्र रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

300 लाभार्थ्यांनी घेतला मोफत नेत्र रोग निदान शिबिराचा लाभ

कामठी :-महात्मे नेत्र रुग्णालय आणि स्वामी रामकृष्ण मठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी तालुक्यातील कढोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित मोफत नेत्र रोग तपासणी शिबिराला लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिराचा 300 लाभार्थ्यांनी लाभ घेतला ज्यातील जवळपास 80 लाभार्थ्यांना मोफत चष्मे वितरण करण्यात आले तसेच 55 लाभार्थ्यांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सोमलवाडा येथिल महात्मे हॉस्पिटल ला पाठविण्यात आले.

या मोफत नेत्र रोग तपासणी शिबिराला महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर व रामकृष्ण मठ नागपूर च्या वैद्यकीय चमूने विशेष वैद्यकीय सेवा पुरविली.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी कढोली ग्रा प चे सरपंच प्रांजल रमेश वाघ , उपसरपंच , समस्त ग्रा प सदस्य तसेच ग्रामस्थांनी मोलाची भूमिका साकारली.