Published On : Fri, Jun 28th, 2019

चैन स्नॅचिंग करण्याचा प्रयत्न फासला, आरोपी चैनस्नेचर अटकेत

Advertisement

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बुद्ध भूमी खैरी समोरील पेट्रोलपंपांवर दुचाकीत पेट्रोल भरायला गेलेल्या एका इसमाला मागेहुन दोन इसम दुचाकी ने येऊन हुज्जत घालून गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रकाराला केलेला मज्जाव व प्रतिकारातून केलेल्या आरडाओरड ने रस्त्यावरील जमावाने मदतीला धावले असता त्यातील एका चैनन्सनेचर आरोपीने पळ काढन्यात यश गाठले तर वेळीच जुनी कामठी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एका चैनस्नेचर आरोपिला अटक करण्यात यश गाठले तर दुसरा चैनस्नेचर पसार आहे.अटक चैनस्नेचर आरोपीचे नाव शेख अक्रम शेख कासीम वय 40 वर्षे रा यादव नगर नागपूर असे आहे.

ही घटना काल रात्री साडे आठ वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार यशोधरा नगर रहिवासी अरुण मोर्चापुरे हे स्वतःच्या दुचाकी क्र एम एच 40 एस 3238 मध्ये खैरी येथील बुद्ध भूमि समोरील पेट्रोलपंप वर पेट्रोल भरायला जात असता दोन इसम मोपेड गाडी क्र एम एच 49 एस 2123 ने मागेहुन येऊन दुचाकी आडवी करून त्या वृद्ध इसमाची कॉलर पकडून हुज्जत घातली व गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र या वृद्ध इसमाने केलेल्या प्रतिकारातून तसेच केलेल्या आरडाओरड मधून लोकांचा झालेला जमाव पाहून आरोपी चैनस्नेचराणी पळ काढण्यात यश गाठले तर जुनी कामठी पोलिसांनी वेळीच पोहोचून त्यातील एका आरोपीचा शोध लावन्यात यश गाठले व त्याकडून चैणस्नेचिंग साठी वापरण्यात आलेली मोपेड गाडी जप्त करण्यात आली.तर फिर्यादी अरुण मोर्चापूरे वय 63 वर्षे रा यशोधरा नगर नागपूर ने दिलेल्या तक्रारी वरून दोन्ही आरोपी विरुद्ध भादवी कलम 341,393, 34 अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला.एक आरोपी अटक असून दुसरा आरोपी पसार आहे

ही यशस्वी कारवाही डीसीपी हर्ष पोद्दार , एसीपी परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश पुरभे, किशोर मालोकर, रामनाथ चौधरी, अलोक रावत, किशोर गांजरे, विजय सिन्हा, विवेक श्रीपाद, रोशन कारेमोरे, वाहनचालक महेश कठाने यांनी यशस्वीरित्या राबविली असून पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी