Published On : Fri, Jun 28th, 2019

राम एज्युकेशन सोसायटीचे अतिक्रमण काढण्याची नासुप्र’ची कार्यवाही पूर्ण

चौथ्या दिवशी २५ कर्मचारी व १० पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती

नागपूर : उत्तर अंबाझरी मार्गावरील मौजा लेंड्रा येथील नागपूर सुधार प्रन्यासची २.९४ एकर जागा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ला हस्तांतरित करावयाची असल्यामुळे ०.५ एकर जागेवर अस्तित्वात असलेले श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अतिक्रमण काढण्यासाठी आज सलग चौथ्या दिवशी अतिक्रमण कार्यवाही करण्यात आली.

आज अखेरच्या दिवशी देखील ५ जेसीबी व ३ टिप्पर’चा वापर करण्यात आला असून कार्यवाही दरम्यान २५ कर्मचारी व १० पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली होती. यावेळी विभागीय अधिकारी (पश्चिम) श्री अविनाश बडगे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्रीमती पुष्पा शहारे, स्थापत्य अभि सहाय्यक श्री अभय वासनिक व क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील तसेच २५ कर्मचारी आणि १० पोलीस कर्मचारी उपस्थित होते.