Published On : Mon, Aug 7th, 2017

प्रधान मंत्री आवास योजनेसाठी कामठी शहराचा समावेश – चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागपूर : प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांकडे हक्काचा निवारा नाही अशा कुटुंबासाठी परवडतील अशा घरकुल योजनेमध्ये कामठी शहराचा समावेश करण्यात आला असून शहरातील जास्तीत जास्त कुटुंबांसाठी घर बांधणीचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

रविभवन येथे कामठी शहरातील आययुडीपी क्षेत्रातील जागेवर प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना राबविण्यासंदर्भात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महसूल उपायुक्त पराग सोमन, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय महसूल अधिकारी अविनाश कातडे, म्हाडाचे मुख्याधिकारी संजय भिमनवार, तसेच इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत कामठी शहरातील मोकळया जागेवर घरकुल योजना राबविण्यासाठी म्हाडातर्फे आराखडा तयार करावा, अशा सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शासकीय जागेवर अतिक्रमण असलेल्या कुटुंबांना या योजनेत घरकुल उपलब्ध करुन दिल्यानंतर या मोकळया जागेवरही ही योजना राबवावी. म्हाडातर्फे सुमारे एक हजार घरांची योजना तयार करण्यात आली असून त्यामध्ये विणकरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावा, अशी सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी केली.

कामठी येथे धान्य बाजार सुरु करणार
कामठी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत प्रशस्त धान्य बाजार तयार करण्यात येणार असून येथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. हा धान्य बाजार शासकीय गोडाऊनच्या परिसरात सुरु करण्यात येणार असल्यामुळे ही जागा कृषी उत्पन्न बाजार समितीला उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

शासकीय गोडाऊन परिसरातील तीन एकर जागा धान्य बाजारासाठी उपलब्ध होणार असून येथे नवीन मार्केट तयार करण्यात येईल. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. कामठी येथे शेतकऱ्यांसाठी धान्य बाजारची आवश्यकता असल्यामुळे कुषी उत्पन्न बाजार समितीमार्फेत प्रशस्त मार्केट तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक वापरासाठी महादुला नगरपंचायतीला जागा
महादुला येथील नगरपंचायतीच्या अंतर्गत सार्वजनिक वापरासोबतच रस्ते, वीज, पाणी आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कोराडी येथील महानिर्मिती कंपनीची 12.06 एकर आर जमीन नगरपंचायतीला उपलब्ध करुन देण्यात येणार असून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महादुला नगरपंचायतीला जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात महसूल अधिकारी, तसेच महानिर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक रविभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

महादुला येथे फार पूर्वीपासून राहत असलेल्या व अतिक्रमण केलेल्या कामगारांना प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाचा प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Advertisement
Advertisement