Published On : Mon, Aug 7th, 2017

मालमत्ता व पाणी कर अभय योजनेला तीन दिवस मुदतवाढ

Advertisement

नागपूर : मालमत्ता कर आणि पाणी कर थकीत असलेल्या नागरिकांसाठी मनपाने जाहीर केलेल्या अभय योजनेला आता तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. थकबाकीदारांना आता १० ऑग़स्टपर्यंत थकीत कर रकमेचा भरणा करता येईल. या तीन दिवसांत नागरिकांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.

मालमत्ता कर अभय योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांना थकीत करातील दंडाची रक्कम ९०% माफ केली जात आहे. थकित पाणी बिलावरील विलंब शुल्क किंवा दंडाची रक्कम १००% माफ करण्यात येत आहे. नागरिकांनी भविष्यात आपल्या मालमत्तेवरील जप्ती टाळण्यासाठी व नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई टाळण्यासाठी पुढील तीन दिवसात आपले थकीत कर भरावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अशी जाणून घ्या आपली थकीत रक्कम

आपल्या पाणी कराची थकीत रक्कम जाणून घेण्यासाठी नागरिकांना www.ocwindia.com आणि मालमत्ता कर थकबाकी जाणून घेण्यासाठी www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर भेट देता येईल. तसेच SMS द्वारे जाणून घेण्यासाठी NMCWTR<आपल्या पाणीबिलावरील कॉन्ट्रॅक्ट अकाउंट नं.> किंवा NMCPRT<आपल्या कर पावतीवरील इंडेक्स नं.> ५६१६१ या क्रमांकावर पाठविता येईल. अधिक माहितीकरिता १८००-२६६-९८९९ य़ा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

७ ऑगस्टला आठ कोटींवर वसुली
७ ऑगस्टला सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत मालमत्ता कर थकबाकीदारांनी ५ कोटी ७३ लाख ८५ हजार ९४८ रुपये इतकी रक्कम जमा केली. पाणी करापोटी थकबाकीदारांनी २ कोटी ८० लाख १८ हजार ९२ रुपयांचा भरणा केला. नोकरदार वर्गाची समस्या लक्षात घेत त्यांच्या मागणीपोटी या योजनेला तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. या तीन दिवसादरम्यान जप्ती व लिलावाची कारवाई सुरू राहणार असून थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्याची संधी देण्यात येत आहे.

TODAY TAX COLLECTION: 5,73,85,948.35 (UP-TO EVENING 6.15 PM)
TODAY WATER TAX COLLECTION: 2,80,18,092 (UP TO EVENING)

Advertisement
Advertisement