Published On : Mon, Jun 3rd, 2019

कामठीत पोलीस शिपायाचा संशयास्पद मृत्यू

कामठी: स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन मधून नुकतेच शहर पोलीस मुख्यालयात बदली झालेल्या एका पोलीस शिपायाचा रणाळा कामठी येथील भाड्याच्या खोलीत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काल 2 जून ला रात्री 10 वाजता निदर्शनास आले असून मृतक हेड कॉन्स्टेबल चे नाव राजेश रामदास रेवते वय 52 वर्षे रा प्रगती नगर रणाळा कामठी असे आहे. तसेच मृतक पोलिस शिपाई सेवानिवृत्त उपविभागिय पोलीस अधिकारी रामदास रेवते यांचा मुलगा आहे.मृत्यूवेळी घरात कुणी नसून मृतक एकटाच घरात होता तसेच मृतकाच्या तोंडातून रक्तस्त्राव तसेच पांढऱ्या रंगाचा फेस पडत असल्याने या मृत्यू प्रकरणात विविध शंका कुशंकेला वेग येत असून संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यात असले तरी शवविच्छेदन अहवाला नंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक पोलीस शिपाई राजेश रेवते हा दारूच्या अतिशय व्यसनाधीन असून नोकरी वरून निरंतर सुट्ट्यावर असायचा तसेच मागिल तीन महिन्यापासून नोकरीवर गैरहजर होते . मृतक 2 जून ला सकाळी घराबाहेर पडून दुपारी 12 वाजता घरी परतले असता पत्नी मनीषा ने जेवायला दिले असता जेवण करण्याचे टाळून झोपायला गेले दुपारी 4 वाजता झोपेतून उठले असता पत्नी मनीषा ही मुलगा यश च्या शाळेच्या दफतर साठी नागपूरला असलेल्या बहिणीकडे जाण्यासाठी मूलगी दिशा ला घेऊन दुचाकीने निघाली यावेळी मृतक राजेश हा घरी एकटाच होता रात्री 10 वाजता पत्नी नागपूर हुन घरी परतले असता दार आतून बंद असल्याने आवाज देऊनहीं दार उघडत नसून कुठलाही आवाज येत नसल्याने घरमालका च्या मदतीने जिन्यावरील दार उघडून आत प्रवेश केले असता मृतक हा दिवाणाखाली पडलेल्या स्थितीत दिसून आला तसेच त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव सह पांढऱ्या रंगाचा फेस वाहताना दिसल्याने घर कुटुंबियाना एकच धक्का बसला यावेळी पत्नी मनीषा ने घरमालक तसेच शेजारील मंडळींच्या मदतीने नजीकच्या नागाणी हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले मात्र तोवर डॉक्टरने मृत घोषित केले होते या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच नवीण कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनार्थ कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर शवविच्छेदन अहवाला वरूनच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मृतकाच्या पाठीमागे वडील , एक लहान भाऊ, पत्नी मनीषा , यश नावाचा 16 वर्षीय मुलगा तसेच दिशा नावाची 11 वर्षीय मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. फिर्यादी पत्नी मनीषा राजेश रेवते वय 42 वर्षे हिने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिम घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.मृतक राजेश ला दारूच्या अतिशय व्यसनाधीन झाल्याने कदाचित अति मद्यप्राशनाने मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे

– संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement