Published On : Sat, Sep 21st, 2019

कामठीत प्रख्यात कव्वालीचे आयोजन आज

सकाळी रक्तदान सह मोफत चष्मे वाटप

कामठी :- बाबा ताजुद्दीन बहुउदेशीय फाउंडेशन कामठी च्या वतीने 21 सप्टेंबर ला सय्यद बाबा अब्दुल्ला शाह नौशाही कादरी,चिल्ल शरीफ उर्स सय्यद ताजुद्दीन ऑलिया (र.अ) निमित्त व स्व. नारायण पहेलवान यांच्या स्मृती निमित्त वॉटर कुलर चे उदघाटन, मोफत चष्मे वाटप व रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे

या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते करण्यात येणार असून यावेळी नप नगराध्यक्ष शहाजहा सफात अन्सारी, माजी नप उपाध्यक्ष रणजित सफेलकर,सामाजिक कार्यकर्ते अज्जू अग्रवाल, भरत हाटे, प्रदीप जोपट, इत्यादी सह असंख्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे त्यानंतर सायंकाळी दरबारी कव्वाल फैजान ताज यांच्या शानदार कव्वालीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या येशस्वीतेसाठी शरद हाटे, शिव हाटे,करण हाटे, युनूसखान दाऊदखान,बाबू भाटी, प्रफुल्ल मूळे, शेख मोता सिंग,इमरान खान इत्यादीसह शेकडो कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहे.

संदीप कांबळे कामठी