Published On : Thu, Jun 17th, 2021

कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे

कामठी :- नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला कारेमोरे यांची नियुक्ती केली

सिंहासन हनुमान मंदिर सभागृहात कामठी तालुका भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अरविंद गजभिये होते भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटन बळकट करण्यावर मार्गदर्शन करण्यात आले पक्ष संघटन बळकट करीत असताना मेळाव्यात कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला कारेमोरे यांची नियुक्ती केल्याचे पत्र अरविंद गजभिये यांनी दिले

यावेळी आमदार टेकचंद सावरकर ,कामठी तालुका भाजपा अध्यक्ष किशोर बेले ,जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेता अनिल निधान ,जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके ,पंचायत समिती सदस्य वनिता जिचकार माजी सरपंच मनीष कारेमोरे माजी सभापती देवेंद्र गवते , उमेश महाले , विशाल चामट, किरण राऊत ग्रामपंचायत सदस्य नरेश मोहबे, वनिता नाटकर,गजानन तिरपुडे ,सुमेध दुपारे, अमोल घडले ,जयश्री धीवले ,मंगला पाचे, रमण पाचे, राजकिरण बर्वे, पौर्णिमा बर्वे उपस्थित होते