Published On : Thu, Jun 17th, 2021

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन

कामठी :- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी कामठी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकाना पोषण ट्रॅकर अप्स इंग्रजी मध्ये इंग्रजी मधून सुरू करण्यात आले आहेत या अप्स मध्ये इंग्रजीमध्ये माहिती भरतांना अंगणवाडी सेविकांना फार त्रास होतो पूर्वीच्या अंगणवाडी सेविका लागले आहेत त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झाले असून त्यांना इंग्रजी मध्ये अप्स मध्ये माहिती भरताना फार त्रास होत आहे चुकीची माहिती पोषण ट्रॅकर एप्स मध्ये जात आहे त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप मराठीतच करण्याची मुख्य मागणी आहे

शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकेला फार वर्षांपूर्वी दिलेले मोबाईल जुने झाले असून जुन्या मोबाईल मध्ये पोषण ट्रॅकर अप्स डाउनलोड होत नसून नवीन मोबाईल द्यावे, लाभार्थी बालकाचा आधार कार्ड क्रमांक जोडल्या शिवाय त्यांना पूरक पोषण आहार चा लाभ मिळत नाही अशी जाचक अट पोषण ट्रॅकर मध्ये घालण्यात आलेली आहे आधार कार्ड नसेल तरी त्या बालकाला पोषण आहार शासनाच्याने देणे बंधनकारक आहेत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा अधिकार चुकीचा आहे त्यामुळे कधीकधी ॲप्स मध्ये भरलेली माहिती सेंड होत नाही किंवा मोबाईल मध्ये रेंज न मिळाल्याने वेळेवर माहिती न पोहोचल्यामुळे मानधनात कपात करण्यात येत आहे

ही चुकीची पद्धत शासनाच्या वतीने चालू केली असून ही पद्धत रद्द करण्याची मागणी केली आहे कोरोनाच्या पादुर्भाव मध्ये अंगणवाडी सेविकांना सॅनिटेशन ,मास्क, कीट देण्यात आली नाही त्यामुळे कामठी येथील दोन अंगणवाडी सेविकेची चा मृत्यू झाला असून आजपर्यंत त्यांच्या कुटुंबांना शासनाच्या वतीने कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही , शासनाकडून अंगणवाडी सेविकांचा वीमा काढण्याची मागणी केली आहे वरील सर्व मागण्या शासनाच्या वतीने त्वरित मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम काळे ,कामठी तालुका अध्यक्ष आशा पाटील, सचिव सीमा गजभिये ,मंदा कपाळे ,संगमित्रा पाटील ,,छाया कडू, ज्योती अंडरसायरे ,जयश्री चहांदे सह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

संदीप कांबळे कामठी