Published On : Tue, Apr 7th, 2020

कामठी चे दोन कोरोना पॉजिटिव्ह आढळले आग्र्याला

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरातून एक 16 वर्षोय तरुण छत्तीसगढ च्या कोरबा येथे 40 दिवसाच्या तबलिगी जमात च्या कार्यक्रमात सहभागी व्हायला 1 मार्च ला कामठी तुन गेले असता निजामुद्दीन येथील मरकज येथे सहभागी झालेला एक व्यक्ती कोरबा जिल्ह्यातील कटघोरा येथे आल्यानंतर सदर तरुणाच्या संपर्कात आल्याने या 16 वर्षीय तरुणाची केलेल्या वैद्यकीय कोरोना चाचणीत कामठी चा हा अल्पवयीन कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले ही माहिती कामठी तालुक्यात पोहोचताच सर्वत्र खळबळ माजली आहे या घटनेला विराम मिळत नाही तोच आग्रा येथील जमात धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या कामठी शहरातील 12 लोकापैकी क्रमशः 43 व 73 वर्षोय दोन इसम हे कोरोनाबधित आढळल्याची माहितो विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर या दोन्ही कोरोनाबधित कुटुंबातील समस्त सदस्यांना खबरदारी घेण्याच्या माध्यमातून घरातच 14 दिवसासाठी होम कोरोनटाईन करण्यात आले आहे .

विश्वसनोय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मागील मार्च महिन्यात आग्रा येथे मुस्लिम समुदायाचे 40 दिवसाचे आयोजित जमात कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपूर्ण भारत देशातून 124 अनुयायी आले होते ज्यामध्ये नागपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या कामठी शहरातील 12 अनुयायी चा समावेश होता तर हे 12 अनुयायी कामठी शहरातून 1,मार्च ला आग्रा ला जाण्यासाठी शहराबाहेर पडले मात्र परत कामठी ला आलेच नव्हते मात्र संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव भारतासह महाराष्ट्रात पोहोचताच शासनाच्या वतीने संचारबंदी, जमावबंदी सह लॉकडॉउन करीत जिल्हा सह तालुका सीमाबंद करण्यात आले आहेत तसेच खबरदारी घेण्याच्या उद्देशाने बाहेरून आलेल्या नागरिकांचे कोरोना चाचणी करन्यात येत आहे यानुसार आग्रा येथील शासकीय रुग्णालयात कामठी शहरातून आलेल्या बारा जणांची वैद्यकीय तपासणीतून कोरोना चाचणी करण्यात आली ज्यामध्ये 12 पैकी 2 जण हे कोरोना बाधित आढळले आहेत.

कामठी च्या 16 जणांवर गुन्हा दाखल
छत्तीसगढ च्या कोरबा येथे तब्लिगी जमात च्या 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात सात अल्पवयीन चा समावेश आहे .मार्च महिन्यात ताब्लिगी जमात चे चार व्यक्ती छत्तीसगढ राज्यातील कटघोरा येथे आले होते त्यातील एक व्यक्ती निजामुद्दीन येथील मरकज येथे सहभागी झाल्यानंतर कटघोरा येथे आला होता कोरबा जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाल्या नंतर त्याची तपासणी केली असता कामठी हुन आलेला 16 वर्षोय अल्पवयीन कोरोना पोजिटिव्ह आढळला मात्र कटघोरा येथे थांबलेल्या ताब्लिगी जमातच्या लोकांनी पोलिसांपासून माहीती लपविल्या प्रकरणी कामठी च्या 16 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बॉक्स:- दिल्लीतील निजामुद्दीन मरकज संमेलनासह , कोरबा, आग्रा सारख्या ठिकाणी आयोजित जमात कार्यक्रमात कामठी तालुक्यातून सहभागी झालेल्या समस्त अनुयायांचे तसेच 25 मार्च च्या नंतर विदेशातून, परराज्यातून तसेच पर जिल्ह्यांतून आलेल्या सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे . माहिती मिळालेल्या लोकांना प्रशासनातर्फे भेट घालून होम कोरोनटाईन करण्यात येत आहे तर कित्येकांना नागपूर येथील मेयो हॉस्पिटल तसेच आमदार निवासात विलीगिकरण करण्यात येत आहे मात्र आजूनपावेतो बाहेरून आलेल्या बहुतांश नागरिकांनी प्रशासनाला माहिती न देता बिनधास्त पणे फिरत आहेत तेव्हा स्वता व स्वतःच्या कुटुंबाच्या हितासाठी खबरदारी घेण्याच्या माध्यमातून कोरोना चाचणी करून घ्या , बाहेरून आलेले जे नागरिक स्वतःहून संपर्क करणार नाहीत व त्याबाबतची माहिती तालुका प्रशासनाला माहिती मिळताच माहिती लपविल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भारतोय दंड संहिता कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल तरी संबंधितांनी कामठी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान कामठी चे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे

संदीप कांबळे कामठी