Published On : Tue, Apr 7th, 2020

घोरपड गावात 184 गरजूंना मोफत धान्य वाटप

कामठी:- कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार कामठी तालुक्यात लॉकडॉऊन लागू झाल्याने सर्वच थांबल्याने गोरगरिबांचे जीवन विस्कळीत झाले तेव्हा या गरजू नागरिकांसाठी जेवणाची सोय करण्याच्या मुख्य उद्देशाने घोरपड गावातील काही जागरूक समाज सेवकांनी पुढाकार घेत 183 गरजू नागरिकाना मोफत धान्य वाटप केले.

हे मोफत धान्य वितरण करण्याच्या यशस्वीतेसाठी माजी सरपंच प्रवीण कुतथे, मंगेश लांजेवार, गंगाबाई खांडेकर, बलविर धारमारे, अतुल श्रीरामे, पंकज कुतथे, अक्षय ढोक, रोशन तिडके, सुनील गडमाडे, हरीश मेश्राम,धीरज मानकर, आशिष मेश्राम, लक्ष्मण मांनमुनढरे, दत्तू ठाकरे, मधुकर खाडे, निखिल खाडे, मोहन सरकडे, श्याम उंचेकर आदीनो मोलाची भूमिका साकारून माणुसकीचा धर्म पाळला.

संदीप कांबळे कामठी