Published On : Thu, Jun 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कळमना पोलिसांची मोठी कामगिरी; चार अॅक्टिव्हा चोरीचे गुन्हे उघड, सराईत चोराला अटक

Advertisement

नागपूर : शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कळमना पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एका सराईत वाहनचोराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या चार अॅक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निलेश छगन देवगडे (वय २०, रा. गुलमोहर नगर, कळमना) असे असून त्याच्याविरोधात कळमना आणि लकडगंज पोलीस ठाण्यातील चार वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

३१ मे २०२६ रोजी नेताजीनगर येथील एका नागरिकाची घरासमोर उभी असलेली होंडा अॅक्टिव्हा चोरीला गेल्यानंतर कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच काळात परिसरात अॅक्टिव्हा चोरीच्या अनेक घटना घडत असल्याने पोलिसांनी सर्व प्रकरणांचा एकत्रित अभ्यास केला.

तपासादरम्यान घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. सर्व चोरीच्या घटनांमध्ये एकाच प्रकारची पद्धत वापरण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून निलेश देवगडे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चार वाहनचोरीचे गुन्हे कबूल केले.

Advertisement

तपासात आरोपी वाहनांना लॉक नसल्याची खात्री करून त्यांची चोरी करत असल्याचे समोर आले. तो प्रथम वाहन काही अंतर हाताने ढकलत नेत असे आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर ते सुरू करून पसार होत असे. या पद्धतीमुळे तो बराच काळ पोलिसांच्या नजरेतून बचावला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून तो अभ्यासात चांगला होता. मात्र चुकीची संगत, महागडे शौक आणि झटपट पैसे कमावण्याच्या मोहामुळे तो गुन्हेगारीकडे वळल्याचे चौकशीत समोर आले.

या कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली असून कळमना पोलिसांच्या तत्पर तपासामुळे चार चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges