Published On : Sun, Jan 5th, 2020

कालिदास सांस्कृतिक महोत्सवाला थाटात सुरुवात

नागपूर: सांस्कृतिक राजधानीची ओळख बनलेल्या कवी कालिदास सांस्कृतिक महोत्सवाला शानदार सुरुवात झाली. या त्रि-दिवसीय समारोहाची संकल्पना यंदा कवि कालिदास यांच्या “विक्रमोर्वशीयम्”या नाटकावर आधारित आहे.

उद्घाटनपर कार्यक्रमात ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत, महापौर संदीप जोशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गिरीश गांधी, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले.

महोत्सवाला शुभेच्छा देताना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचे दाखले दिले. प्रेरक मार्गदर्शन करताना त्यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या महापौर संदीप जोशी यांनी स्थानिक कलाकारांना संधी ही महोत्सवाची जमेची बाजू असल्याचे सांगितले.

महोत्सवाचे स्वरूप पुढे विस्तारेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी केले. मार्गदर्शन करताना त्यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर आणि शिल्पा शेलगावकर यांनी केले.

कार्यक्रमाला संस्कार भारतीच्या नागपूर महानगर अध्यक्षा काृचन गडकरी आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार प्रामुख्याने उपस्थित होते.