Published On : Thu, Nov 21st, 2019

कल्याणी सरोदे ला नॅशनल इंडियन ग्लोरी अवार्ड २०१९ चा सन्मान

कांद्री – कन्हान ची मुलगी कु कल्याणी सरोदे ला राष्ट्रीय सन्मान.

कन्हान : – उडिशा राज्यातील धर्मनगरी जगन्नाथ पुरी येथे हॅप्पी मोमेंट्स संस्था व्दारे देशातील विविध श्रेत्रात प्रतिभावं ताना सन्मानित करण्यात आले. यात कन्हान कांद्रीची कु. कल्याणी सरोदे हिला मेकअप आर्टिस्ट नॅशनल इंडियन ग्लोरी अवार्ड २०१९ ने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुर शहरात विविध श्रेत्रात प्रतिभावंत म्हणुन कल्याणी सरोदे हिला ओळखल्या जाते. याच श्रृंखलेत उडिशा राज्यातील धर्मनगरी जगन्नाथ पुरी शहरात हॅप्पी मोमेंट्स संस्थापक राजेंद्र पंडा व्दारे आयोजित देशातील १६ राज्याच्या ४२ व्यक्तीना विविध श्रेत्रातील प्रतिभावंताना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास समाजसेवा अर्जेमटीमा ची ओडिशी नुत्यगंणा आनंदिंनी दासी, अभिनेत्री नीतु सिंह, संगितकार सुमित महापात्र, मुंबई चे शाहनवाज शेख आदीने योगदान केले. प्रमुख अतिथी म्हणुन जगन्नाथपुरी चे आमदार श्री जयंता कुमार सारंगी व मान्यवरांच्या हस्ते कन्हान कांद्रीचे श्री सोमाजी सरोदे यांची मुलगी कु.कल्याणी सरोदे हिला मेकअप आर्टिस्ट नॅशनल इंडियन ग्लोरी २०१९ चा अवार्ड प्रधान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानाने स्व:त गौरवणित होऊन परिसरातील मुलींना ब्युटीशियन श्रेत्रात प्रगती करण्याकरिता प्रेरित केले आहे. मेकअप आर्टिस्ट श्रेत्रात राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाल्याबद्दल कु. कल्याणी सरोदे हिने आपल्या परिवारचे, शुभचिंतकांचे आभार व्यकत केले आहे.

कु कल्याणी सरोदे च्या यशाबद्दल ग्रामीण पत्रकार संघ कन्हान, मराठा सेवा संघ कन्हान, रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व विविध संस्थे व्दारे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.