Published On : Wed, Apr 8th, 2020

भाजपाची वानामतितिल कोरोना संशयित तबलकिंना बिडगावला हलवायची मागणी निरर्थक

कामठी :- धरमपेठ येथिल जनतेच्या जिवाला मरकज मध्ये सहभागी झालेल्या तबललकिंना वानामतीमध्ये क्वारेंनटाईन केल्याने धोका निर्माण होतो म्हणुन त्यांना बिडगाव येथिल सिम्बॉसिस मध्ये हलवण्याचे निवेदन *भाजपा नगरसेवक संजय बंगाले यांनी दिलेले हे निवेदन निरर्थक असून अशोभनीय आहे कारण कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या बीडगावला नागपूर चे कचराघर,डॉग शेलटर आहे आणि आता कोरोना संशयिताला ही वनामती कोरोनटाईन मध्ये हलविण्याची मागणी करण्यात येत आहे तेव्हा बिडगावला माणसं राहतात की जनावर असा सवाल नागपूर जिल्हा परिषद च्या स्थायी समिती सदस्य अवंतिका ताई लेकुरवाडे यांनी केला आहे.

कोरोनाच्या संकटातुन देश सुखरुप निघाला पाहिजे म्हणुन आम्ही मदत करायला तयार आहोत. बानामती व आमदारनिवास फुल भरला म्हणुन कोरोना संशयित सिंबॉसिस मध्ये ठेवल्या गेले. आम्ही काही अडचण निर्मान केली नाही. पंरंतु जर धरमपेठच्या जनतेला धोका होतो म्हणुन जर कोरोना संशयित तबलकिंना सिंबॉसिस बिडगाव येथे हलविण्यात येत असेल तर मा बिडगावची जनता स्वस्त बसणार नाही.

याची नोंद संबंधित तहसिलदार, उपविभागिय अधिकारी आणि जिल्लाधिकारी यांनी घ्यावी अशी मागणी प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे यांनी केली आहे*