Published On : Fri, Aug 9th, 2019

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन

Advertisement

रामटेक: महाराष्ट्र राज्य(कायम)विना अनुदानित उच्च माध्यमिक कमवी शाळा कृती समिती रामटेकच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना नीलिमा रंगारी तहसीलदार,रामटेक व संगीता तभाने गटशिक्षणाधिकारी प स रामटेक यांच्या माध्यमातून दिनांक 9 आगस्टपासून कामबंद आंदोलनात सहभागी होत असल्याचे निवेदन तालुका अध्यक्ष राजेश हिंगे ,उपाध्यक्ष दिपाली वांद्रे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित प्राध्यापकानी दिले.

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक गेल्या पंधरा वर्षांपासून विनाअनुदानित महाविद्यालयात विनावेतन तसेच अल्प मानधानावर कार्य करीत आहेत. परंतु शासनाला वेळीवेळी निवेदने दिली,प्रत्येक हिवाळी,पावसाळी,उन्हाळी अधिवेशनाचे वेळी उपोषण, मोर्चे काढून , 221 च्या वर आंदोलने करूनही फक्त आश्वासनासमोर काहीच प्राप्त झाले नाही.

आणि शासनाने शिक्षकांचा शंभर टक्के अनुदानाचा प्रश्न अनुत्तरित ठेवल्यामुळे आज कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे आर्थिक व मानसिक शोषण मोठ्या प्रमाणावर होत असून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक आर्थिक कोंडीत व विवंचनेत सापडलेला असून यावेळीही कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

निवेदन देतेवेळी रामटेक तालुक्यातील विनाअनुदानित महाविद्यालयात तील प्राध्यापक सी एम कामोने,बी बी ढोरे,डी एम मारोतकर,ए एम चकोले, जे डी धोटे,एम व्ही दातीर, एन एस सपाटे, पी एम मेश्राम, डी एस राणे,पी एस देशभ्रतार,व्ही जी गजभिये, ए बी बरोले, जे आर मेश्राम, एस एफ जाधव ,एस एस थोटे, एस एल टाले,एच एम लांजेवार, जे जी गुजरकर, बाळकृष्ण राजूरकर, एफ जी शेख,ए एन भामकर व इतर प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.