
नागपूर: दुर्गानगर येथील ‘ज्युनिअर चॅम्पियन प्रो ॲक्टिव्ह अबॅकस’च्या विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन 2026’ या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे दुर्गानगरसह संपूर्ण नागपूर शहराचा गौरव वाढला आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत संस्थेच्या 15 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळवले. यामध्ये दिलाशा नितनवरे, मधुरा वासनकर, ओम ढोमणे, सक्षम ढोबळे, रुद्र बानाईत, स्नेतिक मांडवे, श्लोक डहाके, सुदर्शन केजरीवाल, वेदिता केजरीवाल, छयन गजपुरे, खुशाल मस्कर, महेक राजपूत, नेत्र हजारे, सानवी साबळे आणि निधी धोंडे यांचा समावेश आहे.
पायल ढोमणे मॅडम यांना ‘बेस्ट सेंटर अवॉर्ड’
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबरोबरच संस्थेच्या संचालिका व प्रशिक्षिका पायल ढोमणे मॅडम यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देत सातत्याने यश मिळवून दिल्याबद्दल संस्थेला प्रतिष्ठेचा ‘बेस्ट सेंटर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
पालकांनी पायल ढोमणे मॅडम यांच्या समर्पित मार्गदर्शनाचे आणि अभिनव अध्यापन पद्धतीचे विशेष कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच पायल ढोमणे मॅडम यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, संस्थेने सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
अदरक के दाम गिरने से किसान परेशान #maharashtranews #newsupdate #kisan #latestnews
हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल
मानेवाड़ा दहन घाट में दिनदहाड़े खूनी झड़प, पुराने विवाद में युवक की...
मेलघाट आश्रमशाला में फिर छात्र बीमार #maharashtranews #amravati #ashramshala #bhojan #viral
जर्जर दीवार गिरने से रिक्शा चालक घायल #maharashtranews #accident #newsupdate #kalyandombivli
बालासाहेब के विचारों पर चलें: पाटिल #maharashtranews #modi #sanjayraut #bjp #shivsena





