Published On : Sat, Apr 1st, 2017

पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला निषेधार्हः विखे पाटील

मुंबई: वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

या हल्ल्याचे वृत्त कळताच विखे पाटील यांनी सुधीर सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की, राजकारणातील वाढते गुन्हेगारीकरण ही चिंतेची बाब आहे. पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला का व कुणी केला याचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा आणि हल्लेखोरांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली.