Published On : Wed, Oct 30th, 2019

‘रन फॉर युनिटी’मध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा – रविंद्र ठाकरे

नागपुर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उदया दिनांक गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये शहर व जिल्ह्यातील नागरिक , युवक-युवती, तसेच खेळाडू, सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.

Advertisement

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या कक्षामध्ये आज ‘ रन फॉर युनिटी ‘ या एकता दौडच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली , त्यावेळी ते बोलत होते .

Advertisement

एकता दौडमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा ठिकठिकाणी उपलब्ध असाव्यात . पाणी , प्रथमोपचार सुविधा , चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्यात .

Advertisement

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही दौड अमरावती रोड येथील संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे.

यामध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू , युवक , सामाजिक संस्था , नागरिकांनी उदया दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता विद्यापीठ मैदानावर तयार रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड तसेच बॉक्सिंग मार्गदर्शक अरुण बुटे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement