Published On : Wed, Oct 30th, 2019

भिमगड येथे दिवाळीमिलन कार्यक्रम उत्साह

पारशिवनी : पाराशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील भिमगड येथे पंचायत समिती पारशिवनी आणि ग्रामसेवक संघटना पारशिवनीच्या वतीने आदिवासी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. पंचायत समिती पारशिवनीचे गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांच्या संकल्पनेतून पं.स. व तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने दिवाळीमिलन कार्यक्रम २६ ऑक्टोबर रोजी ग्रा.पं.चारगावअंतर्गत भिमगड या आदिवासीबहुल गावातील कुंवारा भिवसेन देवस्थान चे सभागृह येथे पार पडला. .

आदिवासी गावातील एका कुटुंबातील प्रत्येक सदस्याला नवीन कपडे, बैग फटाके , चिमुकल्यांसाठी मिठाई, फळे व फटाके वाटप करण्यात आले. शौचालय बांधून वापरणे, बेटी बचाओ, बेटी पढाओ, कुपोषण निर्मूलन, आरोग्य व पाणीबचत, प्लास्टिकबंदी, प्रदूषणमुक्त दिवाळीवर गटविकास अधिकारी बमनोटे यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला महसूल विभागाकडून मिळणारे दाखले, अन्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न राहणार आहे.

समस्या असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून बीडीओ प्रदीप बमनोटे, सहा.गट.विकास. अधिकारी अंकुलवार, विस्तार.अधिकारी.(पं) नामदेव जाधव, शा.अभि. जाधव, मेंघर(माजी जि पः सदस्य), राजेश कडू (माजी सभापती), डॉ. इरफान, गोपाल कडु(वारिष्ठ पत्रकार), पुष्पा भगवान गदरे (सरपंच चारगाव ग्राम पंचायत) भगवान गदरे, ठाकरे, प्राचार्य राजक्षी उखरे, स्व.भा. मिशनचे देवा तुमडाम, मुनेश दुपारे, ग्रा.पं. सचिव कोरे, विनायक गहाणे, लांजेवार, इंगोले, ठवरे, बांबल, सोनवाने, रक्षणा गजभिये, अंगणवाडी सेविका, मदतानेस,प्रातिब्ठीत नागरिक व गाककरीनागरिक तथा महिला उपस्थित होते. प्रास्ताविक विनायक गहाणे (अध्यक्ष,तालुका ग्राम सेवक संघटना), संचालन मुनेश दुपारे तर आभार शेळके(ग्राम सेवक ,वराडा ग्राम पंचायत) यांनी मानले. आयोजनासाठी ग्रामसेवक संघटनेने सहकार्य केले

(पाराशिवनी तालुका प्रातिनिधी कमल यादव)