Published On : Mon, Jul 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात टीसीएसमध्ये नोकरीसह कार लावून देण्याचे आमिष; तरुणाची 15.14 लाखांची फसवणूक

Advertisement

नागपूर : टीसीएस कंपनीत नोकरी लावून देणे, कार भाडेतत्त्वावर कंपनीत लावून देणे तसेच कर्ज माफ करून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची 15 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यंकर नगर येथील 23 वर्षीय ओंकार नरेंद्र सोमेवार हा कार भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय करतो. व्यवसायाच्या निमित्ताने त्याची भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोवर्धन नगर येथील आर्चिश बडवाईक याच्याशी ओळख झाली होती.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपीने ओंकारची कार टीसीएस कंपनीत लावून देण्याचे, त्याला टीसीएसमध्ये नोकरी मिळवून देण्याचे तसेच त्याच्या नावावरील कर्ज माफ करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपीने ओंकार तसेच त्याच्या आई-वडिलांकडून ऑनलाइन आणि रोख स्वरूपात मिळून 15 लाख 14 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.

मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपीने ना नोकरी मिळवून दिली, ना कार कंपनीत लावून दिली, तसेच कर्जही माफ करून दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ओंकार सोमेवार यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Advertisement

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, आरोपी अद्याप फरार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.