
नागपूर : यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमसंबंधाच्या वादातून झालेल्या रक्तरंजित हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शानू उर्फ गोलू वैद्य असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एक देशी कट्टा आणि चाकू जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मकोकाअंतर्गतही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी रात्री एनआयटी परिसरातील रीगल सेलिब्रेशनच्या मागील बाजूस प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. तक्रारदार रेहान इक्बाल शेख हा आपल्या मित्रांसह तेथे उपस्थित असताना शानू उर्फ गोलू वैद्य, कारण निमजे आणि त्यांच्या १० ते १२ साथीदारांनी तेथे येऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराचा मित्र अमित आणि एका तरुणीच्या प्रेमसंबंधावरून मागील सहा महिन्यांपासून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू होता. त्याच वादातून आरोपींनी रेहानला शिवीगाळ करत चाकूने जीवघेणा हल्ला केला. तसेच पिस्तूलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या रेहानला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या घटनेनंतर यशोधरा नगर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करून काही आरोपींना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी शानू उर्फ गोलू वैद्य हा फरार होता. दरम्यान, पोलिसांच्या गस्ती पथकाला तो ऑटोमेटिक चौक ते इटा भट्टी चौक मार्गावर दुचाकीवरून जाताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी कट्टा आणि चाकू जप्त करण्यात आला. तपासात तो या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी मकोकाअंतर्गतही कारवाई केली असून, यशोधरा नगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मंदिर प्रबंधन धर्माचार्यों को सौंपने की मांग #NarendraAcharya #RamMandir #Ratnagiri #EducationNews
प्रेम संबंध के विवाद में हुआ था खूनी संघर्ष #NagpurCrime #Crime #Police...
अदरक के दाम गिरने से किसान परेशान #maharashtranews #newsupdate #kisan #latestnews
हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल
मानेवाड़ा दहन घाट में दिनदहाड़े खूनी झड़प, पुराने विवाद में युवक की...
मेलघाट आश्रमशाला में फिर छात्र बीमार #maharashtranews #amravati #ashramshala #bhojan #viral




