Published On : Fri, May 26th, 2017

आयुक्तांनी केली सक्करदरा तलावाची पहाणी


नागपूर:
नागपूर महानगरपालिकेद्वारे तलाव स्वच्छता अभियान सुरू आहे. गुरुवारी (ता.२५) आयुक्त अश्विन मुदगल यांनी सक्करदरा तलावाची पहाणी केली. या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आय़ुक्त रवींद्र कुंभारे, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त राजेश कराडे प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेने शहरातील सर्व तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेचे आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी सक्करदरा तलावाची पहाणी केली व तेथील स्वच्छतेचा आढावा घेतला. सक्करदरा तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असून तेथे जेसीबी मशीन्स व पोकलेनची व्यवस्था करावी. तलावाच्या काठावरील गाळ, झाडे-झुडपे, केरकचरा लवकरात लवकर काढा, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तलावाच्या सभोवताल असलेल्या गडर लाईन लिकेजमुळे गडरचे पाणी तलावात येऊऩ मिळते त्यामुळे पाणी दुषीत होत आहे. त्यासाठी तातडीने उपायोजना करून ते काम मार्गी लावा, असेही ते यावेळी म्हणाले.


यापुढे तलावात कुठलाही कचरा, मूर्ती विसर्जन करण्यास कायमची बंदी घालावी, तसेच किनाऱ्यालगतची डागडुजी लवकरात लवकर करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. या पाहणीप्रसंगी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, झोनल अधिकारी डी.एल. पडोळे व झोनचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement