Published On : Mon, Sep 27th, 2021

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक जयराज फाटक यांची नागपूर कार्यलयाला भेट

नागपूर: अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक जयराज फाटक यांनी नागपूरच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली व येथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विभागीय संचालक जयंत पाठक यांच्यासमवेत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जयराज फाटक यांची महासंचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला आले. नागपूर केंद्राच्या वतीने जयराज फाटक यांचे शाल व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. फाटक यांनी अधिकारी व कर्मचारी वर्गाशी विविध विषयांवर चर्चा केली. संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम याबाबत त्यांनी माहिती दिली.

जयराज फाटक यांचा परीचय
जयराज फाटक हे १९७९ बॅच चे भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी आहेत. ते नागपूर चे जिल्हाधिकारी, बृहनमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याचे प्रधान सचिव या जबाबदाऱ्यांवर यापूर्वी कार्यरत होते. २०१५ या वर्षी ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाली. त्यानंतर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रोफेसर या पदाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली. नुकतीच त्यांनी संस्थेच्या महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे.