Published On : Mon, Sep 14th, 2020

जिगाव प्रकल्पासंदर्भात जयंत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट

बुलढाणा जिल्यातील जिगाव पाटबंधारे प्रकल्पाच्या अडचणी दूर करून तो यथाशिघ्र पूर्ण करण्याच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. यावेळी राज्यमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, लोकप्रतिनिधी तसेच विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र उपस्थित होते.

डॉ राजेंद्र शिंगणे यांनी राजमाता जिजाऊ व बाळराजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले तैलचित्र राज्यपालांना भेट दिले. आपण लवकरच जिजामाता यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा येथे भेट देऊ असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.