Published On : Thu, Jun 13th, 2019

जयभीम चौकातील 12 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

कामठी: स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौकातील एका 12 वर्षीय मुलावर सैलाब नगर रहिवासी एका 18 वर्षोय तरुनाणे भोई नगर येथील आजीच्या घरी नेऊन घरी कुणी नसल्याचे संधी साधून अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना सायंकाळी 7 वाजता घडली. यासंदर्भात पीडित 12 वर्षीय मुलाने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अजय रवी झोडापे वय 18 वर्षे रा सैलांब नगर कामठी विरुद्ध भादवी कलम 377 अनव्ये गुन्हा नोंदवून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित 12 वर्षीय मुलगा हा घराकडे खेळत असता याच्या परिचित असलेला आरोपी अजय झोडापे ने चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष देऊन नजीकच्या परिसरात असलेले भोई नगर रहिवासी आजीच्या घरी घेऊन गेला दरम्यान घरात कुणी नसल्याचे संधी साधून या अल्पवयीन मुलावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला यातून कसाबसा बाहेर पडून पीडित मुलगा स्वतःच्या घरी पोहोचून आपल्या आई वडिलांना आपबीती सांगताच घरमंडळींना एकच धक्का बसला यावेळी त्वरित घटनास्थळ गाठून पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पीडित फिर्यादी बालकांचे नागपूर येथील मेयो इस्पितळात केलेल्या वैद्यकीय तपासातून आरोपीवर गुन्हा नोंदवून ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

– संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement