Published On : Mon, May 20th, 2019

जनआहारकडून महिन्याकाठी प्रवाशांचा लाखो रुपयांनी लुट !

Advertisement

जनता खाना ते वेज-नॉनवेजवर वसूलले जाते अतिरिक्त शुल्क, प्रत्येक बॉक्सवर पाच ते दहा रुपयाची फसवणूक, मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील प्रकार

नागपूर: प्रत्यक्ष दिसणारे दहा रुपये एक हजार वेळा जमा केले तर दहा हजार रुपये होतात आणि महिन्याकाठी तीन लाख रुपये़ सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना अत्यल्प किमतीत नाश्ता आणि जेवणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून रेल्वे प्रशासनाने मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर जनआहारची योजना अंमलात आणली़ जनाहारमध्ये १५ रुपयाच्या जनता खाना पासून ते ५० रुपये पर्यंत वेज-नॉनवेज (अंडाकरी व अंडा बिर्यार्णी) ठेवण्यात आले आहे़ मात्र, प्रवासी ग्राहकांकडून जनआहारचे कर्मचारी पाच ते दहा रुपये अतिरिक्त वसूल करण्याचा गोरखधंदा इमाने-इतबारे पार पडत आहे़ प्रत्यक्ष दिसणारी पाच किंवा दहा रुपयाची ही लूट महिन्याकाठी लाखो रुपयांची ठरत आहे़ मात्र, इथे लुटला जाणारा सामान्य प्रवासी आहे, रेल्वे प्रशासन नव्हे़
मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाच्या शेजारी असणाºया जनआहारमधून अशी लूट दररोज केली जात आहे़ मात्र, खुले आम होणाºया या लुटीपासून मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाचा वाणिज्य विभाग अनभिज्ञ आहे, तेथे सामान्य प्रवाशांना आपण लुटले जात असल्याची जाणिव कशी होणार, हा प्रमुख प्रश्न आहे़ प्रारंभी जनआहारचे संचालन आयआरसीटीसीकडे होते़ वर्तमानात, खाजगी कंत्राटदाराकडून जनआहारचे संचालन केले जात आहे़ विशेष म्हणजे, जनआहार बाबत सातत्याने वेगवेगळ्या तक्रारी येत असतानाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचा केवळ दिखावाच केला जात असल्याचे प्रत्येक तक्रारीअंती स्पष्ट होते़

Gold Rate
10 May 2025
Gold 24 KT 94,700/-
Gold 22 KT 88,100/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दररोज किमान एक हजार बॉक्सची विक्री
मध्यवर्ती रेल्वेस्थानक असल्याने, येथे दररोज देशाच्या कानाकोपºयातून शेकडो गाड्यांना थांबा मिळतो़ तर काहींचे संचलन येथून होते आणि काहींचा प्रवास याच स्थानकावर संपतो़ अशा तºहेने मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असते़ त्यातील काही प्रवासी किमान शुल्कात पोटाची भूक भागविण्यासाठी जनाहारकडे धाव घेतात़ अशा तºहेने जनाहारमधून दरदिवसाला किमान एक हजार फुड बॉक्सची विक्री होते़ प्रत्यक्षात हजाराहून अधिकची विक्री होत असते़ १५ रुपयाला ह्यजनता खानाह्ण तर, वेज आणि अंडाकरी व अंडा बियार्णी निश्चित ५० रुपयेपर्यंत विकणे बंधनप्राप्त आहे़ मात्र, धावपळीत असणाºया प्रवाशांकडून प्रत्येक फुड बॉक्सवर दहा रुपये अतिरिक्त जोडून वसूल केले जाते़ गडबडीत असल्याने प्रवासी किमतीकडे लक्ष देत नाहीत़ अशा तºहेने महिन्याकाठी लाखो रुपये अनभिज्ञ असणाºया प्रवाशांकडून वसूल केले जात आहे़

पावती दिली जात नाही
रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रवाशांना खाद्य सामुग्री देताना, त्याचे बिल देणे बंधनप्राप्त असल्याचे सांगतात़ मात्र, जनाहारमधून कोणत्याही प्रवासी ग्राहकाला कोणत्याही वस्तूचे अगर फुड बॉक्सची पावती दिली जात नाही़ यामुळे, ग्राहकांशी बेईमानी केली जात आहेच़ शिवाय, रेल्वेच्या स्वस्त खाद्य विक्री धोरणाला बगल दिली जात आहे़

गदीर्चा घेतात लाभ
प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दररोज हजारो प्रवाशांची गर्दी असते़ गाडी आली की आणखी गर्दी वाढते आणि त्या धावपळीत असलेला प्रवासी जास्त विचारपूस करत नाही़ त्याचाच लाभ जनाहारचे कर्मचारी घेत असतात़

कारवाई करणार – राव
जनाहार संदर्भात अनेक तक्रारी आहेत़ त्यांना वारंवार समज दिल्यानंतरही तोच प्रकार होत असेल, तर त्यांच्या निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक एस़जी़ राव यांनी दिले आहे़

Advertisement
Advertisement