Published On : Wed, Jul 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

जम्मूहून नागपुरात आलेल्या प्रेमीयुगुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात; संयुक्त कारवाईत प्रकरणाचा उलगडा

Advertisement

नागपूर – जम्मूमधील एका तरुणी बेपत्ता प्रकरणात नागपूर पोलिसांनी जम्मू पोलिसांना मोठी मदत केली आहे. जम्मूहून नागपुरात आलेल्या प्रेमीयुगुलाला संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोघांनाही पुढील तपासासाठी जम्मूला रवाना करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूतील बहू फोर्ट परिसरात राहणारी १८ वर्षीय विवाहित तरुणी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी ७ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान संबंधित तरुणी तिच्या पूर्वीच्या परिचयातील एका तरुणासोबत नागपुरात आल्याची माहिती समोर आली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तांत्रिक तपासाच्या आधारे जम्मू पोलिसांचे पथक नागपुरात दाखल झाले. नागपूर पोलिसांच्या सहकार्याने बजाजनगर परिसरातून तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार इमामवाडा परिसरातून तरुणीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत दोघे गेल्या आठ-दहा दिवसांपासून नागपुरातील विविध हॉटेल आणि परिचितांच्या घरी राहून आपले ठिकाण बदलत असल्याचे समोर आले. तरुणाने यापूर्वी नागपुरात शिक्षण घेतले असल्याने येथे लपून राहणे सोयीचे ठरेल, असा त्याचा अंदाज होता.

Advertisement

जम्मू आणि नागपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हे प्रकरण उघडकीस आले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोघांनाही पुढील चौकशीसाठी जम्मू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.