Published On : Wed, Jul 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कळमना पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; एक आरोपी, अल्पवयीनासह ताब्यात

Advertisement

नागपूर -नागपुरातील कळमना पोलिसांनी भरदिवसा झालेल्या घरफोडीचा यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात एका आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून ६ लाख ११ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मिनी माता नगर येथील रहिवासी लोकनाथ यादव यांनी १ जुलै रोजी सकाळी घराला कुलूप लावून दुकानात गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील दोन हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत सुमारे ९ लाख १६ हजार रुपये होती.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तक्रार दाखल होताच कळमना पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे गौरव सचिन पालिवाल याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांकडून ६ लाख ११ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.