Published On : Tue, Oct 11th, 2022
By Nagpur Today Nagpur News

बोल बजरंग..’ हनुमानाचा साक्षात्कार झाल्याचं सांगत चोराने गदा दिली परत आणून VIDEO

Advertisement

चोर कधी काय चोरी करेल याचा नेम नाही. नागपूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका भामट्याने मारुतीच्या मंदिरातून गदा गायब केली होती. पण, मारुतीचा साक्षात्कार झाला असं सांगत या चोराने गदा परत मंदिरात आणून दिली. त्यांचा हा प्रामाणिकपणा पाहून मंदिर प्रशासन हैराण तर झाले. पण, चुकीला माफी नाही असं म्हणत या चोराला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत पांदन रोड कन्हान इथं मारुती मंदिर आहे. या मंदिरात हा प्रकार घडला. 8 ऑक्टोबरला संदीप लक्षणे हा चोर मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्याने दर्शन घेतलं आणि मारुतीरायाच्या चरणी वंदन केले व प्रदक्षिणा मारतांना बाजूला ठेवलेली गदासोबत आणलेल्या पिशवीत टाकून पसार झाला.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यादरम्यान मंदिर प्रशासनाने पोलिसात तक्रार दिली. सीसीटीव्हीमध्ये सर्व घटना कैद झाली होती. त्यामुळे पोलीस आरोपीचा शोध घेत होते. तरदुसरीकडे सोमवारी 10 ऑक्टोबरला आरोपी संदीप लक्षणे हा चोरलेली गदा घेऊन मंदिरात प्रकटला. ‘मला मारूतीरायाचा साक्षात्कार झाला आहे, त्यामुळे मी गदा घेऊन गेलो होतो ती ती परत आणली आहे’ असा दावाच या पठ्ठ्याने केला.

मंदिर प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. 1500 रुपये किमतीची 1 किलो पितळेची गदा व पितळेचे अगरबत्ती पात्र किंमत 500 रुपये असा एकूण 2000 मुद्देमाल होता त्यामुळे चोराच्या अपेक्षेपेक्षा कमी किमती मुद्देमाल असल्याने कदाचित त्याने साक्षात्कार झाल्याच्या बनावाने गदा परत आणून दिली असावी असा पोलिसांना संशय आहे.

सुशिल कुमार शिंदेनी मोबाईल चोराला पकडले

चोर कधी काय आणि कुठे चोरी करेल याचा नेम नाही. अशाच एका चोराचा फटका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना बसला आहे. रेल्वे प्रवासाच्या दरम्यान सुशील कुमार शिंदे यांचा मोबाईल चोरीचा प्रयत्न झाला. पण, सुशीलकुमार शिंदे सुद्धा कमी नाही, त्यांनी या चोराला फोन चोरताना रंगेहाथ पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरहुन मुंबईकडे सिद्धेश्वर रेल्वेनं प्रवास करत होते. त्याच दरम्यान ही घटना घडली. सुशीलकुमार शिंदे हे मुंबईला कामाच्या निमित्ताने रेल्वेनं येत होते. त्यावेळी प्रवासात एका तरुणाने सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला.

गाडी मुंबईजवळ पोहोचली असता सुशीलकुमार शिंदे हे टॉयलेटमध्ये गेले होते, त्याच वेळी संधी साधून या चोरट्याने शिंदेंचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. पण, शिंदे यांच्या नजरेतून या तरुणाची मोबाईल चोरी चुकली नाही. शिंदे यांनी आपल्या डोळ्यांनी आपलाच मोबाईल चोरी होताना पाहिला. त्यांनी लगेच आपल्यासोबत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने तरुणाला पकडले.

Advertisement
Advertisement