| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Oct 15th, 2018

  महावितरणच्या तीन अभिनव योजनांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स आणि उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) कृषीपंपांना नवीन वीजजोडणी या तीन योजनांचे उद्घाटन मंगळवारी (दि. १६) दुपारी १२ वाजता राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.

  मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील (मंत्री, महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)), मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार (मंत्री, वित्त आणि नियोजन, वने) मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे (मंत्री, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क), मा. ना. श्री. मदन येरावार (राज्यमंत्री, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) व सामान्य प्रशासन) आणि राज्याचे मुख्य सचिव श्री. डी. के. जैन हे उपस्थित राहणार आहेत.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145