नागपूर: रिपब्लिकन विद्यार्थी संघटना, नागपूरच्या वतीने लक्ष्मी नगर चौक येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. आंबेडकरांच्या पावित्र्याचा अनुभव घेतला आणि समाज परिवर्तनाच्या महत्त्वाचा संदेश घेतला.
कार्यक्रमात किताबे रोशन बारमासे यांनी सांगितले, “अन्नाचा कण पोटात न गेला तरी चालेल, पण डोक्यात आंबेडकरी साहित्य असणे आवश्यक आहे.” ते आंबेडकरी साहित्य वाटप करताना बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे, धम्म नायक रवीभाऊ शेंडे, रिपब्लिकन नेते दिनेश बनसोड, आंरिमोचे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, तसेच आदेश बागेश्वर, विक्रम भारद्वाज, दिपक उमरे, एड. मिलिंद खोब्रागडे, प्रा. राहुल मून, सुमित बंसोड, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुधीर वासनिक, सुधीर मोटघरे, धर्माजी बागडे, प्रा. रमेश दुपारे उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांच्या भाषणावर आधारित, भारतीय संविधान, बौद्ध धर्म, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पुस्तके मोफत वाटप करण्यात आली. २५ हजार पुस्तके लोकांना दिली गेली, तर नागरिक सकाळपासून लांबलचक रांगा लावून आले होते.
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला सुप्रसिद्ध कवी तन्हा नागपूरी यांनी पुष्पहार अर्पण केला, तर नामदेवराव निकोसे यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी प्रकाश कांबळे, सुरेश घाटे, सुखदेवराव मेश्राम, हंसराज उरकुडे, संजय मोटघरे, दिनेश पेंशने, गबरूवान आणि बारमासे कुटुंबीय उपस्थित होते.
ही माहिती विजय वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.