Published On : Fri, Aug 23rd, 2019

नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी शासनाची-पालकमंत्री बावनकुळे

नवीन कामठी भागात जलशुद्धिकरण संयत्राचे लोकार्पण
सीएसआर निधितुन आणखी 25 जलशुद्धिकरण संयंत्र

कामठी:-मानवी शरीरास अपायकारक आजार हे दूषित पाण्याने होतात नागरिकांना आजार होऊ नयेत यासाठी शुद्ध पाणी पुरविन्याची जबाबदारी शासनाची असून राज्यात विविध ठिकाणी शुद्ध पाण्याचे जलशुद्धिकरण केंद्र उभारली जात आहेत असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले

नवी कामठी भागातील प्रभाग क्र 16 येथील कुंभारे कॉलोनी येथे जलशुद्धिकरण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी सामाजिक उत्तरदायित्व निधि अंतर्गत शुद्ध पाणी जलशुद्धिकरण केंद्र उभारणीस सहकार्या करणाऱ्या डीआयजिओ कंपनी लि. यु के चे अधिकारी शुभृतो गिद,अवंती शंकरनारायनन,संगीता ठकराल, शुभृतो बनर्जी तसेच अभिजीत गान,न प मुख्याधिकारी रमाकांत डाके, ०प्रदीप तांबे, भाजप शहर अध्यक्ष विवेक मंगतानी, नगर सेवक प्रतीक पडोळे, स्नेहलता गजभिये,छोटु मानवटकर,संध्या रायबोले, सुषमा सिलाम, दीपक सिरिया, अजय कदम,दिपांकर गणवीर,अश्फाक कुरेशी, कमल यादव, उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री बावनकुले यांच्या हस्ते जलशुद्धिकरण केंद्राचे यशस्वी संचालन करणाऱ्या पाच निवडक महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांचा स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमा च्या यशस्वी ते साठी सुभाष भात्रा,राजेश खंडेलवाल,सचिन पाटिल यांनी सहकार्य केले

आणखी 25 जलशुद्धिकरण केंद्र मंजूर
ना बावनकुले यांनी कार्यक्रमात उपस्थित डीजिओ कंपनी च्या अधिकाऱ्याना आणखी जलशुद्धिकरण केंद्र उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले,त्यावर अधिकाऱ्यांनी तत्काल 25 जलशुद्धिकरण केंद्र मंजूर केली महिला बचत गटाना ना नफा ना तोटा तत्वा अंतर्गत व्यवसाय वृद्धि साठी तीन चाकी ई रिक्शा देखील देण्यात येतील

महिला बचत गट ना नफा ना तोटा अंतर्गत जलशुद्धिकरण केंद्र चालवितात त्यांना व्यावसायिक विज दर आकारले जातात त्यात सुधारना करण्यात येईल अशी घोषणा ना बावनकुले यांनी केली या घोषणा चे कार्यक्रमात उपस्थित शेकडो महिलानी टाळया च्या गजरात स्वागत केले

ना बावनकुले यांनी केले वृक्षारोपण
शुद्ध पाण्या सोबतच शुद्ध हवा देखील आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे असे ना बावनकुले यांनी वृक्षारोपण प्रसंगी सांगितले
यावेळी सम्राट नगर मैदानात विविध ठिकाणी 50 वृक्ष लागवड करण्यात आली

संदीप कांबळे कामठी