Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jun 21st, 2019

  गुन्हेगारी नियंत्रणासाठी तोतयागिरीवर आळा बसविणे अति गरजेचे:-पी आय संतोष बाकल

  कामठी :-‘सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगुण जनसनाण्यांसाठी सदैव तत्पर असणारे पोलीस कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यात मोलाची भूमिका साकारत असले तरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच गालबोट उठले आहे तेव्हा कामठी शहरातील गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी नागरिक व पोलीस यांच्यातील सुमधुर संबंध प्रस्थापित करून वैचारिक समन्वय साधण्यावर भर देत निरंतर कुठल्या ना कुठल्या प्रकरणात तोतयागिरीची भूमिका साकारणाऱ्या तोतयागिरी बहादुरांच्या मुसक्या आवळणे अति गरजेचे असल्याचे मौलिक प्रतिपादन नवीन कामठी पोलीस स्टेशन चे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकार कार्यक्रमात व्यक्त केले.

  यावेळी वाठोडा पोलीस स्टेशन ला बदली झालेले तत्कालीन पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी नवनियुक्त पी आय संतोष बाकल यांना पोलीस निरीक्षक पदाची जवाबदारी देत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दुययम पोलीस निरीक्षक पाल प्रामुख्याने उपस्थित होते.

  पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सार्वत्रिक बदल्या आदेशान्वये नागपूर शहर सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांच्या आदेशानव्ये निघालेल्या बदली यादीनुसार नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरक्षक बापू ढेरे यांची नव्याने सुरू होणाऱ्या वाठोडा पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त ठिकाणी राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष भीमराव बाकल यांची नियुक्ती करण्यात आली.

  तत्कालीन पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांनी 4 जुलै 2018 ला कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता जवळपास 11 महिने यांनी योग्यरीत्या कर्तव्यदक्ष भूमिका साकारली. यांच्या कार्यकाळात दरवर्षी होणाऱ्या खुनाच्या गुन्ह्याच्या तुलनेत एकही खूनाचा गुन्हा घडला नाही इतकेच नव्हे तर 384 लोकांवर प्रतिबंधक कारवाही करून गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात आले .नवनियुक्त पोलीस निरीक्षक संतोष बाकल 1995 बैच च्या सरळ सेवा भर्तीतील पीएसआई म्हणून नोकरिवर रुजू झाले होते. दरम्यान यांनी 5 वर्ष चंद्रपुर , 2 वर्षे गढचिरोली , 5 वर्षे बुलढाणा , 5 वर्षे यवतमाळ , 3 वर्षे वर्धा व 3 वर्ष राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत राहिले तद्नंतर कामठी पोलीस स्टेशन ला आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले.

  संदीप कांबळे


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145