Published On : Thu, Aug 8th, 2019

समाजातील गरीब माणसाला लाभ देणे ही आमची जबाबदारी : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

नागपूर: समाजातील गरीब माणसापर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवणे आणि त्या योजनांचा लाभ गरीब माणसाला देणे ही आमची जबाबदारी आहे. शासनाने अनेक योजना ग्रामीण भागातील जनतेसाठी तयार केल्या आणि सुरु केल्या आहेत, या सर्व योजनांचा लाभ गरीब माणसाने घ्यावा असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केेले.

पारशिवनी येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅसचे सिलेंडर आणि शेगडी वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने आ. मल्लिकार्जुन रेड्डी, विकास तोतडे, अरविंद गजभिये, कमलाकर मेंघर, किशोर रेवतनकर, संजय टेकाडे, योगेश वाडीभस्मे, अविनाश खळतकर, प्रकाश वांढे, प्रतिभा कुंभलकर व अन्य उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले- गावातील गरीब माणसाला घरकुल मिळावे म्हणून पंतप्रधान आवास योजना आली. यात सर्वांना घरकुले मिळणार आहे. आता घरकुलांसाठी शासनाकडे जाण्याची गरज नाही. उपविभागीय अधिकार्‍यांनाच अधिकार दिले आहेत. एक पैसाही न घेता पट्टेवाटप करण्यात येणार आहेत. याचवेळी पांदन रस्ते, झुडुपी जंगलांचे प्रश्न, सर्वांसाठी अन्न योजना, जीवनदायी योजनांची माहिती नागरिकांना दिली. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आता 600 रुपयांवरून 1200 रुपये केल्यााचेही पालकमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले.

आ. मल्लिकार्जुन रेड्डी
केंद्रातील मोदी शासनामुळे आज गॅस गरीबांना नि:शुल्क मिळत आहे. 2014 पूर्वी गॅस सिलेंडरचा काळा बाजार आपणच पाहिला आहे. त्यावेळी गॅसची टंचाई असल्याचे सांगणारे सरकार होते. आता मोदी शासनाने गरीबांना नि:शुल्क गॅस उपलब्ध करून दिला आहे. सर्वांना घरे देण्याचे शासनाचे धोरण आहे.

या योजनेत पात्र असलेल्या सर्व लाभाथींना घरकुलाचा लाभ दिला जाईल, असेही आ. रेड्डी यांनी सांगितले. पारशिवनीत या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी पालकमं÷त्र्यांच्या हस्ते गरजूंना गॅस सिलेंडर व शेंगडीचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकलही याप्रसंगी वाटण्यात आली.

या कार्यक्रमानंतर देवलापार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचे भूमिपूजनही पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.