Published On : Thu, Aug 8th, 2019

नागरिकांची कामे आता देवलापार येथेच होतील : पालकमंत्री

Advertisement

देवलापार अप्पर तहसिल कार्यालयाचे उद्घाटन

नागपूर: देवलापारला तहसिल कार्यालया सुरु करण्याची नागरिकांची दीर्घ काळाची मागणी होती. ती मागणी आता पूर्ण होत आहे. नागरिकांना आता शासकीय, महसूलशी संबंधित कामांसाठी रामटेक येथे जाण्याची गरज राहणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Gold Rate
24 July 2025
Gold 24 KT 99,500 /-
Gold 22 KT 92,500 /-
Silver/Kg 1,15,500 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देवलापार येथे अप्पर तहसिल कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, माजी जि.प. सदस्य शाांता कुमरे, आदिवासी नेते वासुदेव टेकाम, विकास तोतडे, किशोर रेवतकर, अरविंद गजभिये, कमलाकर मेंघर, संजय टेकाडे, योगेश वाडीभस्मे, अविनाश खळतकर, महेश बमनोटे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- 72 गावांसाठी हे कार्यालय असून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ आता येथे देणे सोपे होईल. येत्या 15 दिवसात पावनी येथे 35 गावांसाठी एक महावितरणचे कार्यालय उघडले जाईल. तसेच वडंबा येथे 33 केव्हीचे एक उपकेंद्र 5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार आहे. तसेच एक मोठी प्रशासकीय इमारत बांधून त्या इमारतीत सर्व कार्यालये असतील. शासकीय अधिकारी दोन दिवस येथे येऊन नागरिकांच्या समस्या सोडवितील असेही पालकमंत्री म्हणाले.

आ. मल्लिकार्जुन रेड्डी
काँग्रेसला 15 वर्षात जे जमले नाही, ते आम्ही 5 वर्षात करून दाखविले असे सांगाताना आ. रेड्डी म्हणाले- आता लोकांची कामे झाली पाहिजेत. पूर्वी येथे एकही अधिकारी दिसत नव्हता. जनसुविधा, स्वच्छ पाण्यासाठी एटीएम, स्वच्छता, कर्मचार्‍यांची घरे अशा सर्वसुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री गडकरी व पालकमंत्री बावनकुळे आपल्यासोबत आहेत त्यामुळे निधीची कमी पडणार नाही असेही आ. रेड्डी म्हणाले.

Advertisement
Advertisement