Published On : Mon, Aug 12th, 2019

रेल्वे तिकीट केंद्रात चोरट्यांचा सुळसुळाट

धावत्या रेल्वेतही चोरी

नागपूर: रेल्वेचा प्रवास आनंदाचा आणि खिशाला परवडणारा असल्याने प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. मात्र, चोºयांचे प्रमाण वाढत गेल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे. धावत्या रेल्वेत तर चोरीचे प्रमाण आहेच. शिवाय रेल्वे स्थानक, परिसर आणि तिकीट केंद्रावरही चोरट्यांचा सुरळसुळाट असल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

नागपूर रेल्वे स्थानकाच्या पूर्व प्रवेशव्दाराकडी तिकीट केंद्र परिसरातून एक मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली. अरविंद गोविंदराव मालपे, (७६, रा. आष्ठि, जि. वर्धा) असे प्रवाशाचे नाव आहे. मालपे यांनी दिल्ली ते नागपूर असा प्रवास केला होता. त्यांना नागपूर स्थानकाहून पुढे पॉडीचेरीला जायचे होते. त्याकरिता पुर्व प्रवेश द्वार अर्थात संत्रामार्केट कडिल परिसरातील तिकीट केंद्रावर ते तिकीट काढण्याकरिता आले होते. तिकीट काढत असताना त्यांच्या नजर चुकीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल लंपास केला. मोबाईल दिसत नसल्याने लोहमार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तास लोहमार्ग पोलिस करीत आहे.

दुसरी घटना धावत्या रेल्वेत घडली. तामिळनाडु एक्स्प्रेसने प्रवास करणाºया एका महिलेचे ३० हजार रुपये अज्ञात आरोपीने पळविल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंदिनी वरदराजन (३२, रा. अम्मलवाडत, काईम स्टिट, झेलम, तामिळनाडु) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्या १२६२२ तामिळनाडु एक्स्प्रेसने (कोच ए-२, बर्थ ३१) दिल्ली ते चेन्नई असा प्रवास करीत होत्या. अज्ञात आरोपीने इटारसी येण्यापुर्वीच त्यांच्या बॅगमधून ३० हजार रुपये चोरून बॅग शौचालयात फेकून दिली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी आल्यानंतर फिर्यादी महिलेने लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली.
तिसरी घटना कामठी ते कन्हान दरम्यान ६ आॅगस्टला उघडकीस आली. हेमा दिलीप तनवाणी (४२, रा. पांढुर्णा, मध्यप्रदेश) असे महिलेचे नाव आहे. हेमा या पांढुर्णा ते भाटापार असा प्रवास करीत होत्या, दरम्यान कामठी ते कन्हान दरम्यानमध्ये गाडीत असताना त्यांच्या नजरचुकीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग लंपास केली. यामध्ये १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, रोख १५ हजार असा एकॅन २५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठत त्यांनी मोबाईल चोरीची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरुन लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास ईतवारी लोहमार्ग पोलिस करीत आहेत.