एकरी व जड वाहतुकीने मोठ मोठे खड्डे, चिखलाने रोज अपघात
कन्हान: तारसा रोड सिमेंट रस्त्याचे बांधकाम अत्यंत मंदगतीने होत असुन एकरी व बिनधास्त जडवाहतुकीने रस्त्या वर मोठ मोठे खड्डे, चिखलाने अपघाताचे प्रमाण वाढुन निर्दोष नागरिक बळी पडत असल्याने एकेरी रस्ता व्यवस्थित करून सिमेंटीकरण रस्ता बांधकाम तातडीने करावे अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पावसाळापुर्वी सुरू झालेले कन्हान- तारसा रोड सिमेंट रस्त्याचे बांधकाम मंद गतीने अत्यंत हळुहळू व थाबुथाबु होत आहे. जेव्हा की तारसारोड चौक कन्हान चा मुख्य चौक असुन आजुबाजुच्या २० २५ गावाच्या शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला पुरूष नागरिकांना दैनंदिनी याच रस्त्याने ये-जा करावी लागते. या रस्त्या च्या दोन्ही बाजुला भरगच्छ लोकवस्ती असुन याच रस्त्यावर लहान मुलांच्या दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळा व चौका जवळच आदर्श हायस्कुल असल्याने शालेय विद्यार्थी व पालकांना या नादुरूस्त रस्त्याचा भंयकर त्रास होत असुन जिव मुठीत घेऊन ये-जा करतांना अपघात होऊन जखमी सुध्दा व्हावे लागते. जुना व जिर्ण कन्हान नदी पुलामुळे जिल्हाधिकारी साहेब यांचा कन्हान शहरातुन जड वाहतुक बंदीचा आदेश असताना सुध्दा बिनधास्त जड वाहतुकीने तसेच सिमेंटीकरण रस्ता बांधकाम करिता एकेरी वाहतुकीने या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडुन व पावसाच्या पाण्याने रस्ता चिखलमय होऊन ” रस्त्यावर खड्डा की खड्डय़ात रस्ता ” समजणे कठीण झाले आहे. यामुळे रोजच्या रोज अपघाताचे प्रमाण वाढुन निर्दोष नागरिक अपघाताला बळी पडुन जखमी होत आहे. मध्यंतरी क्षेत्राचे आमदार डी एम रेड्डी नागरिकांच्या आग्रहास्तव या सिमेंटीकरणाच्या वेळी कंत्राटदाराला व संबंधित प्रशासनाच्या अधिका-यांना काम लवकर करण्याची तारीद देऊन शुघ्दा ” नव दिन चले ढाई कोस ” स्थिती असल्याने एखाद्या मोठा अपघात झाल्यावरच शासन प्रशासन जागेल का ? असा प्रश्न नागरिक करित आहे.
तारसा रोड सिमेंटीकरणाच्या अत्यंत मंद गतीच्या कामामुळे त्रस्त नागरिकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी सतिश गावंडे हयाना संजय शेंदरे, शैलेश दिवे, अमित भारव्दाज, गोविंद जुनघरे, सुत्तम मस्के, पंकज मेंढे, योगेश उरकुडे, अजुन पात्रे, प्रविण गोडे, संतोष दहीफळकर, सिध्दार्थ ढोके, प्रशांत भोयर, संजय कोलते, उमेश माहुरे, बाळा मेश्राम, राहुल चांदुरकर आदीच्या शिष्टमंडळाने भेटुन निवेदना व्दारे कन्हान-तारसा रस्ता सिमेंटीकरणाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे आणि तोपर्यंत एकेरी वाहतुक रस्ता वरील खड्डे भरून चिखल होईल नाही असा व्यवस्थित रस्ता सुरळीत करण्यात यावा. अन्यथा प्रशासनाच्या विरूध्द तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल त्याची सर्वस्वी जवाबदा री प्रशासनाची राहील अशी विनंती वजा इशारा परिसरातील शेकडो नागरिकांनी केला आहे.
– एम व्ही रहाटे कन्हान