Published On : Mon, Sep 21st, 2020

ईशान घनोटे ची नॅशनल डिफेन्स अकॅडमी एन.डी.ए. करिता निवड

नागपूर : नागपूरच्या ईशान घनोटेची नॅशनल डिफेन्स अकॅडमी एन.डी. ए. साठी निवड झाली. आहे. एनडीए चा ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या 144 व्या कोर्ससाठी यू.पी.एस.सी. तर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या ऑल इंडिया मेरिट लिस्ट मध्ये ईशाने 98 स्थान मिळवले आहे. सेंटर पॉइंट स्कूल नागपूर येथून मॅट्रिक झाल्यावर नागपूरच्या फोर्सेस फाऊंडेशनचे संचालक लेफ्टनंट कर्नल महेश देशपांडे आणि श्रीमती स्फूर्ती देशपांडे यांनी त्याला औरंगाबादच्या सर्विसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट SPI मध्ये प्रवेशासाठी प्रशिक्षण दिले.

ईशान च्या वडिलांचा नागपूरला खाजगी व्यवसाय आहे. त्याची आई डॉ.अभिलाषा सॉफ्टस्किल ट्रेनर आहे व भाऊ विक्रम अभियांत्रिकी चा विद्यार्थी आहे. यांची लहान पणापासून सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. जी योग्य मार्गदर्शन व मेहनतीने पूर्ण झाली.

ईशानने त्याच्या यशाचे श्रेय दि फॉर्सेस फाऊंडेशनचे लेफ्टनंट कर्नल एम.पी.देशपांडे [ सेवानिवृत्त ] SPI चे संचालक कर्नल अमित दळवी [ सेवानिवृत्त ] प्रशिक्षण राजू मानकर बी.एन.नलवडे व आई-वडिलांना दिले आहे.👆