Published On : Sun, Jun 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात विश्वास नांगरे पाटील यांची दमदार एंट्री; नवे पोलीस आयुक्त म्हणून उद्या स्वीकारणार पदभार

Advertisement

नागपूर -वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे रविवारी नागपुरात उत्साहात स्वागत करण्यात आले. पोलीस जिमखाना परिसरात त्यांच्या ताफ्याचे आगमन होताच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे.

विश्वास नांगरे पाटील सोमवारी नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उपराजधानी नागपूरचे राजकीय आणि प्रशासकीय महत्त्व लक्षात घेता येथील सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांचा अवैध व्यापार, सायबर गुन्हे आणि इतर गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आता नवीन पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील नागपूर पोलिसांच्या कामकाजात कोणते बदल घडवून आणतात आणि गुन्हेगारीवर कितपत प्रभावी नियंत्रण मिळवतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.