Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Nov 26th, 2018

  महामार्ग सर्व्हिस रोडवरील अवैध पार्किंग अपघातास निमंत्रण

  कांद्री हद्दीत सर्व्हिस रोडवर उभ्या ट्रकमुळे अपघातात चार लोकांचा बळी.

  कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील कन्हान शहर ते आमडी फाटा पर्यंत चारपदरी महामार्गाचा सर्व्हिस रोडवर सहाचाकी व दहाचाकीच्या वरील चाकी मोठे ट्रक पार्किंग म्हणुन रात्र दिवस उभे असल्याने जोड रस्त्यावरून महामार्गवर येणाऱ्या वाहनाना वाहने दिसत नसल्याने सर्व्हिस रोडवरील अवैध पार्किंग अपघातास निमंत्रण देत असल्याने कांद्री हद्दीतील सर्व्हिस रोडवर उभ्या ट्रकमुळे आता पर्यंत अपघातात चार लोकांचा बळी घेतला आहे .

  नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील कन्हान शहरातील राय नगर, पेट्रोल पम्प, नाका नं.७ , कांद्री , पेट्रोल पम्प कांद्री, जे एन दवाखाना , टेकाडी फाटा , वराडा बस स्टाप, पेट्रोल पम्प वराडा, डुमरा पम्प, डुमरी स्टेशन, डुमरी खुर्द पेट्रोल पम्प, शेतीफार्म, आमडी फाटा पर्यंत असलेल्या अपुऱ्या सर्व्हिस रोडवर सहाचाकी व दहाचाकी च्या वरील चाकाच्या ट्रक, वाहनाच्या उभ्या रांगा लागलेल्या असल्याने महामार्गावरून जोड रस्ताल्या वळताना किवा पेट्रोल व जोड रस्त्याला वळताना सामोर एकाएकी वाहन येऊन अपघाताचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे . रॉय नगर पेट्रोल पम्प पासुन ते टेकाडी बस स्टाप पर्यंत ट्रकच्या सर्व्हिस रोडवर दिवसरात्र रांगाच रांगा लागलेल्या असल्याने दररोज छुटमुठ अपघात होतच असुन यामुळे

  १़़) दि. ३१/१०/१७ ला कांद्री येथील नामदेव झोडबाजी सरोदे हे टेकाडी कॉलोनी येथील हनुमान जयंतीचा महाप्रसाद घेऊन पायदळ कांद्रीला घरी परत येताना जय दुर्गा मंगलकार्यालय समोर अपघात उपचारा दरम्यान दुसऱ्या दिवसी मुत्यु,
  २) दि.९ एप्रिल १८ ला सकाळी धन्यवाद गेट कांद्री येथे एका विहार बांधकाम मजुर किसन लोंढेकर यास दहाचाकी ट्रकने जोरदार धडक मारून जागीच ठार केले ,
  ३) दि.२५ जुन ला जे एन दवाखान्या समोर ट्रकच्या धडकेत मोटार सायकलवर मागे स्वार मंगला दौलत बोरसरे या मुलीचा जागीच मुत्यु
  ४) दि.२४ नोव्हेंबर ला जय दुर्गा मंगल कार्यालय समोर दहाचाकी ट्रकच्या मागे घेताना ऑटोला व उभ्या महिलेला धडक मारल्याने प्रतिभा मोहुर्ले आंगणवाडी सेविकाचा घटनास्थळीच मुत्यु होऊन कांद्री हद्दीतील सर्व्हिस रोडवरील अवैध पार्किंग ची चौथी बळी ठरली आहे .

  नागपुर जबलपुर महामार्गावरील डुमरी स्टेशन चौकाजवळ सुध्दा आतापर्यंत या सर्व्हिस रोडवर ट्रकच्या अवैध पार्किंग मुळे निष्पाप पाच लोकांचा युवकांचा अपघाताने बळी घेतला आहे . प्रत्येक अपघातात संतप्त जमावाने या अवैध पार्किंग च्या विरोधात प्रशासन कडे रोष व्यकत करून या विषयी कार्यवाही ची मागणी केली आहे . परंतु वाहतुक पोलीसाच्या वेळ काढुपणा व निष्काळजी मुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे .

  यामुळे महामार्ग पोलीस व कन्हान वाहतुक पोलीसांनी महामार्गाचा सर्व्हिस रोडवर उ़भ्या ट्रकच्या रांगा, होणा-या अपघात थांबविण्याच्या दुष्टीकोन लक्षात घेऊन जातीने कार्यवाही करावी. अशी परिसरातील नागरिक, प्रवाशी यांनी वेळोवेळी मागणी केली आहे .


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145